इतर

पिंपळनेर च्या श्री संत निळोबाराय देवस्थानाच्या उभारणीत माझे ही योगदान-अण्णा हजारे

श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय संजीवन समाधी परिसर विकासासाठी ७ कोटी १६ लाख रुपयांच्या निधी

दत्ता ठुबे

पारनेर – श्री क्षेत्र पिंपळनेर येथील महाराष्ट्रातील शेवटचे संत निळोबाराय यांचे मंदीर उभारणीस माझेही योगदान असल्याचे गौरवोदगार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले .
श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय संजीवन समाधी परिसरातील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकासांतर्गत महाराष्ट्र शासनाने या देवस्थान साठी ७ कोटी १६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय कर्डीले , नायब तहसिलदार आढारी , पोलीस निरीक्षक समीर बारवकर , उपनिरीक्षक खंडागळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुढे म्हणाले की , माझ्या जीवनात जो बदल झाला , मला तत्वज्ञान कळले, मी लग्न केले नाही , ते केवळ संतांमुळे च . आपण जगायचे कसे , ते शेजारी , गाव , समाज यांच्यापासून शिकावे , जे काही करायचे , ते समाजासाठी च . अन्यथा मी काय लग्न केले असते , मला मुले झाली असती , अन् संसारात गुरफटलो असतो , त्यामुळे मला समाजासाठी काहीही करता आले नसते . आज जे काही केले , ते थोडेच केले , मी पिंपळनेर ते पंढरपूर पायी वारी अनेक वेळा केली , असे ही अण्णा हजारे यांनी प्रतिपादन केले .


जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ म्हणाले की , आज मला अण्णांबरोबर काम करण्यास मिळाले , ते मी माझे भाग्य समजतो . आज पिंपळनेर मधील या विकास कामांचा जो शुभारंभ करण्यात आला , ती सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील , याची मी ग्वाही देतो , पुढील आषाढी एकादशीच्या वारी पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील , कामे करताना अनंत अडचणी येतील , त्या मांडा , त्या सोडविण्याचा प्रयत्न करू , त्यातून आम्हालाही सेवा करण्याची संधी मिळेल ,असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी सालीमठ पुढे म्हणाले की , पंढरपुर ला राज्यातून ज्या काही मानाच्या पालख्या निघतात , त्यामध्ये आपल्या या श्री संत निळोबाराय महाराजांच्या पालखी चाही समावेश आहे , ही आनंदाची बाब आहे .
श्री संत निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत म्हणाले की , देवस्थानच्या अलीकडच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी सालीमठ यांनी मोठा हातभार लावला , त्यांनी या कामांच्या फाईली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक ला पाठविल्या , तेथून त्या मुंबईला मंत्रालयात तीर्थक्षेत्र व पर्यटन विभाग यांच्या कडील ५ आयएएस सचिव दर्जाचे अधिकारी बारकाईने अभ्यास करून अंतिम मंजूरी साठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना . अजित पवार यांच्या कडे आल्या व त्यांनी माझ्या संबंधामुळे त्वरीत ही सर्व विकास मंजूर करून निधी ही वर्ग केल्याने आज या कामांचा शुभारंभ करण्यात आला . या कामांची प्रक्रिया सर्व अधिकारी हाताळतात . खा . निलेश लंके यांनी विठ्ठल रुख्मिणी मंदीर कामासाठी मदत केली . श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी राज्यातील पालख्यां मध्ये आपल्या पालखीला मानाचा ९ नंबर मिळतो , हा समस्त वारकऱ्यांचा सन्मानच समजायचा . राज्यातील सर्वांत मोठा दिंडी सोहळा म्हणून पाहिले जाते . ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा मार्ग ही या संत निळोबाराय महाराजां पासून जातो . त्यामुळे या देवस्थानवर अण्णांचे खूप प्रेम आहे , असे ही सावंत यांनी सांगितले .


यावेळी विविध महिला बचत गटांना प्रत्येकी ६० हजार रुपयांच्या निधी चा धनादेश , वारी व पालखी सोहळा साठी योगदान असलेल्यां चा सन्मान करण्यात आला .
यावेळी कार्याध्यक्ष गोपाळ मकाशीर , निळोबाराय सेवा मंडळाचे अध्यक्ष बबनराव गाजरे , उपाध्यक्ष रघुनाथ रासकर , सर्व विश्वस्त , सरपंच देवेंद्र लटांबळे , उपसरपंच छाया कळसकर , विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button