सुरेश खोसे पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील पत्रकार व महाराष्ट्र राज्य संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने राज्य स्तरीय आदर्श पत्रकार हा पुरस्कार काल रविवार दि.६ रोजी थेऊर गणपती येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पारनेर तालुक्यात विविध वृत्तपत्रांसाठी ग्रामीण प्रतिनिधी म्हणून १९९२ पासून काम करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या लेखनीतून ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडून अंधारातील प्रश्न प्रकाशात आणले गेल्याने त्या सोडण्यास मदत झाली आहे.त्यामुळे पारनेर तालुक्यात त्यांचा चांगला नावलौकिक आहे.
पत्रकारिता करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत झाल्याने त्यांची प्रथम पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी , नंतर अहिल्यानगर जिल्हा सचिव पदी व नुकतीच दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेच्या वरिष्ठांनी राज्य संघटनेत प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली . हे करत असताना पत्रकारिते कडे त्यांनी दुर्लक्ष होवून न देता पत्रकारितेच्या लेखनी ची धार कमी होवू न देता , सातत्याने बातमीदारी करत असतात , म्हणून राज्यस्तर वर काम करणाऱ्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ” राज्य स्तरीय आदर्श पत्रकार ” हा मानाचा पुरस्कार फेटा , प्रमाणपत्र , सन्मान चिन्ह , मेडल प्रसिद्ध चित्रपट अभिनेते , खंडोबा फेम कलाकार महेश देवकाते , अभिनेत्री निलोफर पठाण , अभिनेत्री प्राची पालवे व राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे मुख्य संपादक राहूल कुदनर यांच्या हस्ते व प्रसिद्ध उद्योजक ज्ञानदेव लंके , सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर , ॲड . सोमनाथ गोपाळे , प्रकाश शेळके , संदीप लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी सन्मान स्विकारल्यानंतर सन्मानमुर्ती सुरेश खोसे पाटील म्हणाले की , मला मिळालेला हा पत्रकारितेतील हा सन्मान मी माझे दिवंगत वडील काशिनाथ खोसे पाटील , दिवंगत सासरे दत्तात्रय गहाणडुले व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला समर्पित करत आहे व माझ्या पत्रकारितेच्या लेखनीतून मी समाजातील दुर्लक्षित प्रश्नांकडे लक्ष देऊन ते प्रकाशात आणून ते सोडविण्यास प्रामुख्याने प्राधान्य देणार आहे.त्याच बरोबर अन्याय झालेल्या दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही ही खोसे पाटील यांनी दिली.