उद्योजक भाऊसाहेब घोमल यांच्या पुढाकाराने लिंगदेव ला अंत्यविधीसाठी मोफत वैकुंठ रथ !

गुढी पाडव्याला झाले लोकार्पण
नातेवाईकांची पायपीट थांबणार!
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील लिंगदेव गावचे सुपुत्र व युवा उद्योजक भाऊसाहेब रोहिदास घोमल यांनी लिंगदेव व परिसरातील गैरसोय लक्षात घेऊन ग्रामस्थां साठी विनामूल्य वैकुंठ रथाची सेवा सुरू केली आहे सुमारे पाच लक्ष रुपये पेक्षा अधिक खर्च करून त्यांनी या वैकुंठ रथाचे मराठी नववर्षाच्या तथा गुढीपाडव्याच्या दिवशी लोकार्पण केले
अतिशय सुबक आणि आकर्षक असा हा वैकुंठ रथ त्यांनी स्वखर्चाने बनवून आपले वडील कै रोहिदास महादू घोमल चुलते कै.सूर्यभान महादू घोमल यांच्या स्मरणार्थ हा वैकुंठ रथ बनविला आहे
श्री भाऊसाहेब कोमल हे व्यवसाय निमित्ताने चाकण येथे राहतात गावाकडं एकदा नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने आले असता त्यांना मृत व्यक्तीचे प्रेत स्मशान भूमी पर्यंत आणण्याची परिसरातील जनतेची अडचण त्यांच्या लक्षात आली अंत्ययात्रेच्या वेळेस होणारा नातेवाईकांचा त्रास त्यांनी पाहिला
परिसरातील लिंगदेव, पिंपळगाव खांड, शिदवड ,वाघापूर ,लहित चास पिंपळदरी या परिसरात वैकुंठ रथ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लोकांचा हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आपण करू असा निश्चय केला आणि
ही अडचण सोडवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि लगेच कामाला सुरुवात केली पुण्यात त्यांनी ऑर्डर देऊन या वैकुंठ रथाची अतिशय सुरेख असे काम पूर्ण केले संपूर्ण अल्युमिनियम/ स्टेनलेस स्टील बॉडी मध्ये रथाची निर्मिती केली आणि गुढीपाडवा या दिवशी त्यांनी या वैकुंठ रथाचे लोकार्पण केले परिसरातील गावांमध्ये स्मशान भूमी पर्यंत प्रेत आणण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत होती ती पायपिट आता वैकुंठ रथामुळे थांबणार आहे
श्री भाऊसाहेब घोमल हे उद्योजक असून चाकण रोटरीचे हे सदस्य आहेत यापूर्वी त्यांनी सामाजिक जाणीवे तुन तालुक्यातील अनेक शाळांना शालेय साहित्य, संगणक ई लर्निंग चे साहित्य, शालेय वस्तू चे मोफत वाटप केले आहे त्यांच्या या सामाजिक कामाचे परिसरातून कौतुक होत आहे