इतर

तळ घरात गोवंशीय जनावराची कत्तल करून नेवाशात सुरू होती गोमांस तस्करी !

नेवासा प्रतिनिधी

घरातील तळघरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांसाची तस्करी करण्याचा उद्योग नेवासात सुरू होता याची माहिती मिळतात रविवारी( ता 30) नेवासा पोलिसांनी यावर धडक छापा कारवाई केली

रविवारी दि 30/03/2025 रोजी 11/00 वा. चे सुमारास पो को एकनाथ डमाळे, तसेच पोसई विकास पाटील सो., पोहेकॉ / सुधाकर दराडे, पोकॉ/ अप्पासाहेब तांबे, पोकॉ/ भारत बोडखे, महिला होमगार्ड सावंत असे नेवासा पोलीस स्टेशनला हजर असताना

पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक संतोष आ. खाडे यांनी फोन करून कळविले की, आताच गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, नेवासा खुर्द, नाईकवाडी मोहल्ला, आयेशा मस्जीद जवळ येथे राहणारा ईसम नामे आयाज लालु चौधरी यांचे राहते घरात असलेल्या तळघरामध्ये गोवंशी
जनावरांची कत्तल करुन गोमांसाची विक्री करत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली, तुम्ही लागलीच सदर ठिकाणी जाऊन बातमीतील माहितीची खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोसई पाटील . यांनी पंच 1) संतोष जगन्नाथ गायकवाड रा. नेवासा बु॥ ता. नेवासा जि. अहिल्यानगर 2) शशिकांत छोटु चक्रनारायण रा.नेवासा खुर्द ता.नेवासा जि. अहिल्यानगर यांना पोस्टे नेवासा येथे बोलावुन त्यांना पोसई पाटील यांनी बातमीतील नमुद
हकीगत समजावुन सांगुन कारवाईचे वेळी पंच म्हणून सोबत येणे बाबत कळविले असता त्यांनी त्यास तयारी दर्शविली. त्यानंतर वरील पोलीस स्टाफ, पंच असे

नाईकवाडी मोहल्ला, आयेशा मस्जीदजवळ दक्षिणाभिमुखी सिमेंट विटांनी बांधलेल्या ज्याला लोखंडी गेटचा दरवाजा असलेल्या घरासमोर 11.15 वा. चे सुमारास गेले. त्यावेळी सदरच्या घराच्या तळघारातुन मांसाचा दुर्गंधीयुक्त वास आल्याने सदर तळघरात जाऊन पाहणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन इसम व एक महिला तळ घरातुन जीना वर चढुन आले पो को एकनाथ डमाळे ल व पोसई पाटील असे दोघांना धक्काबुक्की करून घराच्या बाहेर ढकलुन दिले व आरडाओरडा करून तुम्ही माझ्या घरात येवु नका तुम्ही कसे काय आमचे घरात येता असे म्हणाले. त्यावेळी हजर असलेल्या एका पुरूष ईसमाच्या हातात धारदार सत्तुर होता त्याचा आवेग, आरडाओरडा व आक्रमकपणा पाहुन परिसरात भिती निर्माण झाली आजुबाजुच्या रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद केले व मोहल्ल्यामध्ये थांबलेल्या लोकांची पळापळ झाली त्यादरम्यान पोसई पाटील यांनी त्यांना
समजाऊन सांगितले की, तुम्ही गोवंशीय जनावराची कत्तल केली आहे अशी आमच्याकडे खात्रीशीर माहीती आहे. त्याबाबत आम्हाला पाहणी करून खात्री करणे आहे असे त्यांना म्हणाले असता ते जोरजोराने ओरडुन म्हणु लागले की, आमचे तळघरामध्ये कसलेही गोमांस नाही तुम्ही येथे येवु नका येथुन निघुन जा असे म्हणुन मला व पोसई पाटील . यांना पुन्हा धक्काबुक्की केली त्यानंतर पोसई पाटील . यांनी नेवासा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक संतोष आ. खाडे . यांना सदर घडलेल्या घटनेबाबत माहीती दिली
त्यावेळी लागलीच परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक संतोष आ. खाडे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव , पोकॉ सुमीत करंजकर, पोकॉ अरविंद वैद्य, पोकॉ श्रीनाथ गवळी व होमगार्ड स्टाफ असे सर्वजण खाजगी व शासकीय वाहनाने घटनास्थळी आले त्यानंतर सदर दोन इसमांना व महिलेस परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक संतोष आ. खाडे . यांनी सदर ईसमांस शांततेत समजाऊन सांगितले की, तुमच्या घराचे तळघरामध्ये गोमांस असल्याची खात्रीलायक माहीती
मिळाली आहे. तुम्ही आम्हाला तळघराची पाहणी करू द्या असे सांगितले त्यावेळी त्यांनी जास्तीचा पोलीस फोर्स आल्याचे पाहुन तळघराची पाहणी करण्याची संमती दिल्याने पोसई पाटील . यांनी त्यांस प्रथम त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1. अय्यास लालू चौधरी वय 44 वर्ष 2. मुजफ्पर अब्बास चौधरी वय- 26 वर्ष 3.तनवीर अय्यास चौधरी वय 40 वर्ष सर्व रा. खाटीक गल्ली, नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द ता. नेवासा अहिल्यानगर असे त्यांनी त्यांचे नाव गाव सांगितले नंतर पोसई पाटील . मी व ईतर पोलीस स्टाफच्या मदतीने सदर ईसमाच्या घराच्या तळघराची पाहणी केली असता 1) 30,000/- रु.किं.चा 200 किलो गोवंश जातीचे गोमांस 150/- रुपये प्रति किलो प्रमाणे
2) 500/- रु.किं.चा एक लोखंडी सत्तुर धारदार जु.वा. किं.अं.
3) 100/- रु.किं.चा एक लोखंडी चाकु धारदार जु.वा.किं.अं.
4) 1000/- रु.किं.चे 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, 2 किलो वजनाचे लोखंडी माप
जु.वा. किं.अं.
5) 4000/- रु.किं.चा एक लोखंडी वजन काटा जु.वा. किं.अं.
35,600/- रु. एकुण येणेप्रमाणे वरील वर्णनाचे व किमतीचे गोंमास, सत्तुर, चाकु, वजन मापे व वजन काटा असे मिळुन आल्याने ते पोसई विकास पाटील यांनी सोबतचे पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे.
दिनांक 30/03/2025 रोजीचे 11/15 वा.चे सुमारास नेवासा खुर्द, नाईकवाडी मोहल्ला,
नेवासा येथे 1. अय्यास लालू चौधरी वय-44 वर्ष 2. मुजफ्पर अब्बास चौधरी वय – 26 वर्ष 3. तनवीर अय्यास चौधरी वय-40 वर्ष सर्व रा. खाटीक गल्ली, नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द ता.नेवासा जि.अहिल्यानगर 4 ) एक अनोळखी महिला (नाव गाव माहित नाही) यांनी पोलीसांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासुन अडथळा निर्माण केला व महाराष्ट्र
राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करुन गोमांस विक्री करण्याची मनाई असतांना ही कोठुन तरी गोवंशीय जनावरांची खरेदी करुन आणुन त्यांची कत्तल करुन विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आले आहेत. म्हणून माझी त्यांचे विरुध्द भा.न्याय संहिता 2023 चे कलम 132, 271, 325, 3 (5) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 सुधारीत 2015 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button