नेप्ती येथे हनुमान संगीत कथा ज्ञानयज्ञास प्रारंभ

अहमदनगर: – नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरासमोर हनुमान कथा संगीत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्रीराम विजयग्रंथ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हीआयोजन करण्यात आले आहे
या सोहळ्याचे उद्घाटन आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रतिमा पूजन, ग्रंथ पूजन करून कथेला प्रारंभ करण्यात आला. या कथेला महिला व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कथा प्रवक्ते ह. भ. प.संभाजी महाराज शिंदे बोधेगाव हे आहेत ही कथा ३१मार्च ते ७ एप्रिल पर्यंत रात्री ८ ते ११ या या वेळेत होणार आहे . या कथेला तबला ,जितेंद्र महाराज आमले आळंदी, सिंथ वादक ,बळीराम महाराज गिरी, साऊंड सिस्टिम तुषार भुजबळ तर बासरी वादक बाबासाहेब भोर सर यांची साथ संगत असणार आहे.
यावेळी श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष बबन फुले, उपाध्यक्ष बाळासाहेब होळकर, रामदास फुले, माजी सरपंच दिलीप होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर उद्योजक दिलीप दाते ,बापू सोनवणे ,बबन बेल्हेकर, प्रा. एकनाथ होले ,बाळासाहेब बेल्हेकर, मारुती कावरे, चंद्रकांत खरमाळे, बबन शिंदे ,अशोक गवळी, देवराम जपकर ,सुरेश चत्तर ,जालिंदर शिंदे , टिल्लू जवणे ,एकनाथ होळकर, श्रीनिवास महाराज जपकर, बाबासाहेब जाधव, विष्णू गुंजाळ, अशोक जपकर, बाबासाहेब होळकर उमर सय्यद, योगेश कुलकर्णी, बंडू रावळे, भानुदास फुले, राजू फुले, राजाराम जपकर, पोपट मोरे, लक्ष्मण कांडेकर ,संतोष चहाळ, पाराजी होळकर, रावसाहेब इंगोले, रावसाहेब होळकर, दादाभाऊ फुले, रावसाहेब पुंड, दादू थोरात, दत्तू थोरात, शंकर इंगोले, श्रीराम सेवा मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झाले असून संपूर्ण गाव भक्तीमय झाला आहे.

हा सोहळा गावकऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे. सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोहळ्याचे हे ३६ वे वर्ष आहे. ६ एप्रिल रोजी सकाळी राम जन्माचे किर्तन होईल. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. रावसाहेब भागीनाथ होळकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.