दत्ता ठुबे
पारनेर – संपूर्ण देश कार्यक्षेत्र असलेल्या कान्हुर पठार मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची २०२४ – २०२५ या चालू आर्थिक वर्षात २८३२ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून संस्थेचे खेळते भाग भांडवल ९१० कोटी रुपयांचे झाले असल्याने संस्थेने सभासदांचा विश्वास जिंकल्याचे हे द्योतक असल्याचे मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमिता दिलीपराव ठुबे यांनी सांगितले.
सहकारी संस्थांच्या दृष्टीने मार्च महिना खूपच महत्वाचा असतो.या मार्च महिन्यात सर्वच सहकारी संस्थांचा वार्षिक ताळेबंद तयार केला जातो. कान्हुर पठार मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटी ही राज्यातील सहकारी संस्थांमध्ये नावाजलेली असल्याने खातेदार,ठेवीदार,कर्जदार,सभासद व हितचिंतक विश्वास दिल्याने संस्थेने २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षात २८३२ कोटी रुपयांची उलाढाल केली असून संस्थेला ११.५० कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे तर संस्थेकडे ९१० कोटी रुपयांचे खेळते भागभांडवल असून संस्थेला निव्वळ नफा ३ कोटी ८o लाख रुपयांचा झाला आहे.
संस्थेचे दिवंगत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपराव ठुबे यांच्या आर्थिक शिस्तीमुळे सहकार क्षेत्रात संस्था नावारूपाला आली व खऱ्या अर्थाने संस्थेचे खातेदार,ठेवीदार,कर्जदार,सभासद व हितचिंतक यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आह.संस्थेने देशपातळी वर मल्टिस्टेटचा दर्जा मिळविल्याने विश्वासास पात्र काम करण्याची खऱ्या अर्थाने संधी मिळाली आहे असेही मुख्य कार्यकारी अधिकारी नमिता दिलीपराव ठुबे यांनी सांगितले.