
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
श्रीक्षेत्र स्वयंभू काळेश्वर देवस्थान मध्ये वर्षभर भक्तीमय वातावरण टिकून राहते. दरम्यानच्या काळात येणारे उत्सव भक्तीमय वातावरण निर्माण करून भक्तीची एक प्रकारे शक्तीच वाढवतात असे मत यश महाराज साबळे यांनी व्यक्त केले.
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाट्यापासून जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र गुंफा येथील स्वयंभू श्री काळेश्वर देवस्थानच्या प्रांगणात श्रावण पर्वणी निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.शेवगाव नेवासा राजमार्गावरील श्री क्षेत्र गुंफा येथील देवस्थान मध्ये वर्षभर भक्तिमय आनंदी वातावरण असते या मार्गावरून येणाऱ्या अनेक पायी दिंडी व इतरही भक्तगणांना या ठिकाणी थांबण्याचा मोह होतो असे वातावरण या ठिकाणी असल्याने ते नेहमीच मनाला प्रसन्न करते. यावेळी अनेक संत वचनांचा आधार घेऊन त्यांनी भक्ती महात्म्य विशद केले.
यावेळी काळेश्वर संस्थांचे लहानु महाराज कराळे, दत्ता महाराज जाधव,भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, बाळासाहेब काळे,ज्येष्ठ पत्रकार आर आर माने, भास्कर चोपडे, संतोष आहेर, संजय आहेर, शेषेराव काळे, दिलिप सांवत, विठ्ठल चोरमारे, विजय नजन, विजय काळे, सोपान नजन, पांडुरंग गडाख,भाऊसाहेब आहेर, आसाराम खंडागळे, जालिंदर आहेर, नवनाथ आठरे, दत्तादेवा गोसावी, बाळकृष्ण तोगे, प्रवीण खंडागळे, नितीन खंडागळे, परसराम खंडागळे,आप्पासाहेब कमानदार, महादेव आहेर, अशोक हंडाळ, नंदकिशोर नजन, जालिंदर नजन, सचिन पानसंबळ, सुधाकर गरड, अमोल खंडागळे, रामकिसन खेडेकर, सोमनाथ झेंडे, भारत चोपडे, बाबासाहेब साबळे, देवीदास खेडेकर, दत्ता खेडेकर, राजेंद्र साबळे, अशोक पोपळघट, दादा काळे, विकास ससाणे, शाम ससाणे, संतोष बर्डे, दतु दळे यांच्यासह काळेश्वर तरुण मंडळ, काळेश्वर सप्ताह कमिटी गुंफा व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भातकुडगाव फाटा परिसरातील नागरिक मोठ्या श्रद्धेने काळेश्वर देवस्थानवर धार्मिक कार्यक्रमा बरोबर मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात. त्यामुळे वर्षभर भक्तिमय वातावरण काळेश्वर देवस्थान मध्ये टिकून राहते. त्याचबरोबर जायकवाडी प्रकल्पाने विस्थापित झालेला जिल्ह्याच्या इतर भागात विखुरलेले धरणग्रस्त कुटुंब याठिकाणी दर्शनासाठी येतात.या सर्वांचीच काळेश्वर तरुण मंडळ भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ट्रस्टच्या माध्यमातून सेवा करण्याचे संधी मिळते.याचे खूप मोठे समाधान आहे.शंकरराव नारळकर
स्वयंभू काळेश्वर देवस्थान गुंफा तथा माजी सरपंच भातकुडगाव