इतर

पाडळी दर्या येथे हनुमान जयंतीउत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

दत्ता ठुबे

पारनेर – पाडळी दर्या येथे प्रभू श्रीराम , हनुमान जयंती निमित्त आज गुरुवार दि . ३ पासून ते गुरुवार दि . १० पर्यंत ग्रामस्थ , मुंबईकर व पुणेकर मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने नामवंत किर्तनकारांचे हरि किर्तन ठेवून अखंड हरिनाम सप्ताहाचे पाडळी दर्या आयोजन करण्यात आले आहे .
या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे १३ वे वर्षे असून हभप मारूती महाराज कुरेकर , हभप डॉ . नारायण महाराज जाधव , हभप डॉ . विकासानंद महाराज मिसाळ , हभप रामभाऊ राऊत , हभप भास्कर गिरी महाराज व वैकुंठवासी हभप दत्तात्रय महाराज शिरोळे यांच्या मार्गदर्शन व कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम विणा व किर्तन सोहळा काल गुरूवार दि . ३ पासून गुरुवार दि . १० पर्यंत आयोजीत करण्यात आला आहे .

या नामयज्ञात महाराष्ट्रातील ज्ञानवान , विद्वान किर्तनकारां ची हरि किर्तने होणार असून या कालखंडात पहाटे ४ ते ७ काकडा भजन , सकाळी ९ ते ११ श्री विष्णू सहस्त्रनाम आणि नाम जप , सायंकाळी ५ ते ६ वाजता पाडळी दर्या चे हभप राघवानंद महाराज तिकोणे , प्रवचन , सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व श्री भैरवनाथ देवाची आरती , रात्री ७ ते ९ पाडळी दर्या येथील हभप रविंद्र महाराज खोसे , नेवासा च्या माऊली आश्रम चे हभप महंत ज्ञानेश्वर महाराज हजारे माऊली , श्री क्षेत्र आळंदी चे साधक ऱ्हदयरत्न गुरुवर्य डॉ . नारायण महाराज जाधव , श्री क्षेत्र आळंदी चे हभप किरण महाराज पडवळ , श्री क्षेत्र आळंदी चे हभप मृदंग अलंकार गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ , आणे सिद्धपंढरी चे हभप प्रेमानंद महाराज वडगाव शास्त्री , राहुरी चे हभप मनोहर महाराज सिनारे , हभप कृष्णकृपांकित गुरुवर्य डॉ . विकासानंद महाराज मिसाळ हभप यांचे हरि किर्तन होणार आहे .
ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व जोगेश्वर माते चा हळदी समारंभानिमित्त सोमवार दि . ७ रोजी दुपारी ३ ते ६ वाजता हळद फोडणे , घाणा घालणे , देवाला हळद लावणे व औक्षण करणे , देवाचा कलश वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दि . १० रोजी सायंकाळी ४ . ३० ते सायंकाळी ७ वाजता कलशांचे विधीवत पूजन , भव्य कलश मिरवणूक मिरवणूक व आरती नंतर महाप्रसाद संपन्न होणार आहे .
या सप्ताह व हरि किर्तन सेवेला मृदुंगाचार्य हभप ओंकार महाराज थोरात , गायनाचार्य हभप हार्दिक महाराज तर्हे , हभप अभय महाराज मोकमपल्ले व टाळकरी , काकडा , विणेकरी , चोपदार यांची साथ लाभणार आहे , या सप्ताह कालखंड लोकसहभागातून दररोज अन्नदान केले जाणार आहे.
ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दि ११ रोजी पहाटे ५ . ३० ते ७ वाजता महाभिषेक व आरती , सकाळी ८ ते ९ वाजता मांडव डहाळे , ९ ते १० वाजता देवाची बाशिंगे, १० ते सायंकाळी ५ वाजता बाळगोपाळ व नवस दंडवत , सायंकाळी ७ वाजता देवाची महाआरती , रात्री ८ ते ९ वाजता दिवट्यांची मिरवणूक , ९ ते १० वाजता देवाचा छबिना , रात्री ११ नंतर यात्रा करमणूक कार्यक्रम , तर हनुमान जयंती निमित्त शनिवार दि . १२ रोजी पहाटे ५.३० वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम,दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० वाजता कुस्ती शौकिनांसाठी कुस्त्यांचा जंगी हगामा आणि रात्री ७ वाजता यात्रा कमिटी व ग्रामस्थां ची यात्रा जमा खर्चाची बैठक संपन्न होणार आहे.
तरी या ज्ञान यज्ञ,महाप्रसाद व यात्रोत्सवाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन पाडळी दर्या ग्रामस्थ,मुंबईकर व पुणेकर मंडळीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button