ग्रामीण
टाकळी ढोकेश्वरला महामांगलिक सोहळा

पारनेर प्रतिनिधी :
कैवल्यधाम तीर्थ संस्थापिका श्रीमणीभद्रवीर उपासिका प. पू. गुरुवर्या श्री कैवल्यरत्नाश्रीजी म.सा. या मंगळवारी (दि. ३१) महामांगलिकसाठी टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे येणार आहेत
. सदर कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार असून त्यांच्यासमवेत गुरुस्मृती श्रीजी पूज्य म.सा, पूज्य नमोतीर्थाश्रीजी म.सा. उपस्थित राहणार असल्याचे उद्योजक संतोष भंडारी व राजेश भंडारी यांनी सांगितले.
भंडारी परिवारात मृगांश व लवीश या वारसदारांचे आगमन झाले आहे. यानिमित्त महामांगलिकसाठी गुरुवर्या श्री कैवल्यरत्नाश्रीजी म.सा. यांचे चरणस्पर्श टाकळी ढोकेश्वरला लागणार आहेत.
..