नात्यातील गिधाडांपासुन सावध रहा- आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू अंजली देवकर.

अकोले प्रतिनिधी
नात्यातील गिधाडांपासुन सावध रहा-अंजली देवकर.
सर्वोदय विदया मंदिर राजूर येथे पारितोषिक वितरण संपन्न.
जगात जे लोक योग्य निर्णय घेतात ते यशस्वी होत नाही.तर आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करतात. तेच यशस्वी होतात.कष्टातुन पुढे जा.प्रवास जरी कठीण असला तरी
जिद्ध महत्त्वाची असते.घात हा दुसरा कोणाकडून होत नाही.तर ओळखीच्या व्यक्तीकडूनच होतो.म्हणून नात्यातील गिधाडांपासुन सावध रहा.असे प्रबोधन आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू अंजलीताई देवकर यांनी केले.
गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे क्रीडा विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे संचालक विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंजली देवकर विचारमंचावरून बोलत होत्या.
यावेळी प्रा.सुभाष कांबळे,केशव भांगरे,हौसाबाई देशमुख,श्रीराम पन्हाळे,दत्तात्रय साबळे,प्रकाश महाले,लहानु पर्बत,
प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,अधिक्षक मच्छिंद्र ढगे,क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे,विनोद तारू,तान्हाजी नरके,वंदना सोनवणे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी उपस्थित होते.
अंजली देवकर यांनी पुढे मार्गदर्शन करताना महिला पंतप्रधान,राष्ट्रपती होऊ शकतात,त्याप्रमाणे महिला कुस्तीपट्टू देखील होऊ शकते.त्यासाठी परिस्थितीला दोष देऊ नका.जिवनाचा प्रवास खडतर असला,विरोध जरी झाला तरी कधीच हार मानु नका.जिवनात मेहनत केली तर पुढील आयुष्य सुखाचे जाते.परिस्थितीनुसार बदल करायला शिका.हिंमत करायला शिका कारण हिंमत तिथेच किंमत मिळते.वाकडी नजर केली तर ओरमाडून काढण्याची ताकद ठेवा.दिसण्यापेक्षा असण महत्त्वाचे आहे.अशक्य असे काहीच नाही.आत्मविश्वास ठेवा. जिंकल्याशिवाय थांबू नका.स्पर्धा आपल्याशी ठेवा.ताट मानेने जगायला शिका.अशा स्वरूपाचे प्रबोधन केले.लाठी,काठी,दांडपट्टा फिरविणे. स्वतःचे रक्षण कसे करायचे याबद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून स्वसंरक्षणाचे धडे दिले.
केशव भांगरे यांनी आई वडीलांच्या नेतृत्वामुळे मला प्रेरणा मिळाली. त्यातुन यश मिळविणे शक्य झाले असल्याचे विचार व्यक्त केले.
यावेळी केशव भांगरे,प्रा.सुभाष कांबळे,हौसाबाई देशमुख,विदयार्थीनी प्रगती भांगरे,क्रीडा शिक्षक यांचे विशेष सन्मान करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विदयार्थ्यांना टॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.विदयालयाने कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न केले.सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये माध्यमिक विभागाचे उद्घाटन शिक्षक श्रीकांत घाणे यांच्या हस्ते तर उच्च माध्यमिक विदयालयाचे उद्घाटन अंजली देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.सुत्रसंचलन धनंजय पगारे यांनी केले.