इतर

वीज उद्योगातील कंत्राटी कामगार आझाद मैदानावर एकवटले !


मुंबई दि10 वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न शासन, स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, कंत्राटी कामगार विविध सनदशीर मार्गाने आंदोलने, करित आहेत पण अद्याप पर्यंत शासनाने कोणतेही दखल घेतली नाही, विधीमंडळात या बाबतीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला गेला. फक्त किमान वेतन रू 14 ते 15 हजारावर कायम कामगारांच्या प्रमाणेच, रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन वाढी बाबतीत वंचित ठेवुन फक्त कायम कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली त्यामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कामगारांनी दि 9 जुलै 2024 रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने करून सरकार जगाव आंदोलनात मा.उर्जा मंत्री, कंपनी प्रशासनाला जाग आली नाही, त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न भारतीय मजदूर संघ ) अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.

संघटनेच्या महत्वपूर्ण मागण्या

1) वीज उद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दतीने कामगारांना कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा

2) कायम कामगारांच्या प्रमाणे वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना जीवन वेतन प्रणाली प्रमाणे सन्मानजनक वेतनवाढ करावी
3) दोषी कंत्राटदार ना ब्लँक लिस्टमध्ये टाकून कारवाई करावी.
4) आकसाने आणि सुडबुध्दीने नोकरी पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे
5 ) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने करावी .
6) वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात आरक्षण व मार्क द्यावे .
7) अनुसूचित 47 विविध ऊद्योगातील किमान वेतन सुधारणा बाबतीत त्वरित घोषित करून प्रलंबित वाढ फरका सहित देण्यात यावी व राज्यातील विविध ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा ही मागणी केली आहे.

या वेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री किरण मिलगीर, प्रदेश सहसचिव ऍंड. विजय मोहिते, यांनी मार्गदर्शन करून वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असून लवकरच कंत्राटी कामगारांना सन्मानजनक वेतनवाढ, बाबतीत प्रयत्न चालू आहेत असे नमुद केले आहे.
तसेच या वेळी महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघाच्या वतीने किमान वेतन ची अंमलबजावणी करण्या साठी प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शने करून मागणी केली आहे.
या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कार्याध्यक्ष अमर लोहार, उप महामंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, संघटनमंत्री उमेश आणेराव, उमेश विस्वाद व जिल्हा पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले आहे. या वेळी महाराष्ट्र राज्यातील वीज ऊद्योगातील हजारो कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवर प्रधान सचिव ऊर्जा व कामगार यांनी मीटिंग घेऊन तोडगा काढावा ऊर्जामंत्री यांनी दिलेले आश्वासन पाळावे अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button