इतर

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

संगमनेर प्रतिनिधी

दिनांक 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2025 या काळात राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा पणजी, गोवा येथे यशस्वीरित्या पार पडल्या. यामध्ये देशभरातून सुमारे 16 राज्याचे विद्यार्थी/विद्यार्थिनी सहभागी झाले होते, यामध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी विविध खेळ प्रकार व वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्या सौ.शितल गायकवाड यांनी दिली आहे.

      गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले असून यातून अनेक विद्यार्थी राज्य पातळीवर चमकले आहेत. नुकतेच गोवा येथील स्पर्धेत गौरव रमेश गायकवाड (-३७ किलो) पॉईंट फाईट , ब्रांझ मेडल, श्रीराज मिलिंद गोंगे (-६३ लाईट कॉन्टॅक्ट) सिल्वर मेडल, अभिराज संदीप गुंजाळ(+६९ लाईट कॉन्टॅक्ट) ब्राँझ मेडल,साई कांताराम जाधव(-५१ फुल कॉन्टॅक्ट) ब्रांझ मेडल, श्रेयश संतोष आखाडे(-६३ किक लाईट) ब्राँझ मेडल,शिवम रावसाहेब खैरनार(-५७ लो किक) ब्राँझ मेडल, यशोदीप रेवननाथ सोनवणे(-६९ किक लाईट) ब्राँझ मेडल,ऋतुजा कैलास चौधरी(-५० लाईट कॉन्टॅक्ट) सिल्वर मेडल, जागृती महेंद्र सातपुते(-५५ लाईट कॉन्टॅक्ट) सिल्वर मेडल, कोमल संजय घुगे(-६० फुल कॉन्टॅक्ट) गोल्ड मेडल,निलेश मोहन महानुभाव(-६० पॉईंट फाईट) सिल्वर मेडल मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

यामुळे इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थ्यांना एस. एस. सी. व एच. एच.सी . बोर्ड परीक्षेत २० वाढीव गुण मिळणार असून इ.११वी ला व १२ वी नंतर कुठल्याही शाखेत प्रवेश घेण्यासाठी ५% खेळाडू कोटा राखीव असेल. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.शितल गायकवाड व क्रीडा शिक्षक रवींद्र कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख, व्यवस्थापक व्ही बी धुमाळ, प्राचार्य एम ए व्यंकटेश, प्राचार्या सौ.शितल गायकवाड व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button