इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०६/०४/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १६ शके १९४७
दिनांक :- ०६/०४/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४३,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १९:२४,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति ३९:२५,
योग :- सुकर्मा समाप्ति १८:५५,
करण :- बालव समाप्ति ०७:२०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:१० ते ०६:४३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२६ ते १०:५९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०४ ते ०३:३७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
श्रीराम नवमी, देवीला दवणा वाहणे, देवी नवरात्र समाप्ति,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १६ शके १९४७
दिनांक = ०६/०४/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
कामाचा वेग वाढवावा लागेल. दिवसभर व्यस्त राहाल. घरगुती खरेदीसाठी वेळ काढावा. आवड-निवड प्रदर्शित कराल. प्रवासात महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात.

वृषभ
स्वत:ची उत्तम छाप पडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. तरुण वर्गात रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. झोपेची तक्रार जाणवेल.

मिथुन
छोट्याश्या सुखाने सुद्धा खुश व्हाल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा सल्ला लाभेल. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.

कर्क
मनातील इच्छा पूर्ण होईल. कामात प्रगतीचे पाऊल टाकता येईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

सिंह
कलाकारांना अनुकूलता लाभेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. अनुभवाचा वापर करता येईल. योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

तूळ
प्रवास सावधगिरीने करावा. घरगुती समस्या जाणून घ्याव्यात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीत नवीन योजना विचारात घ्याव्यात. मोठ्या लोकांशी ओळख होईल.

वृश्चिक
वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत कराल. कामाला चांगली गती येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.

धनू
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. कौटुंबिक प्रश्न निग्रहाने सोडवावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक स्थैर्य जपावे. जवळचे मित्र भेटतील.

मकर
दिवसभर कामात गढून जाल. आततायीपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या शब्दाला धार येईल. वेळेचे भान राखावे

कुंभ
नसती काळजी करू नये. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. घरात टापटीप ठेवाल.

मीन
जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करता येईल. लहान प्रवास कराल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मुलांच्या बाबतीत अधिक लक्ष घालावे. घरगुती कामे उत्तमरीत्या पार पाडाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button