नेप्ती जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात.

भारताला विश्वगुरू करण्यासाठी सक्षम भावी पिढी घडवावी लागणार
–रमाकांत काटमोरे
अहिल्यानगर : – नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या आवारात झालेल्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून देशातील संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी नाटिकेतून रामायणातील सिता हरण व रावण वधाचे प्रसंग जीवंत करुन प्रेक्षकांची मने जिंकली. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमास ग्रामस्थांनी तब्बल ६७ हजार ५०० रुपयांची वर्गणी देऊन त्यांच्या कलागुणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काटमोरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, लेखाधिकारी रमेश कासार, सी जी पावर कंपनीचे भागवत, निर्मला साठे, रवींद कापरे, विस्तार अधिकारी संजय धामणे, भोसले, केंद्रप्रमुख अंबादास गारुडकर, सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, मुख्याध्यापिका पद्मा मांडगे, सुरेश कार्ले, आशा ढोले, नूतन पाटोळे, मीना नायगावकर (काठमोरे), माजी सरपंच संजय आसाराम जपकर, प्रा. एकनाथ होले, दादू चौगुले, शिवाजी होळकर, संतोष पाराजी चौरे, वसंतराव पवार, लक्ष्मण कांडेकर, साई संजिवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब होळकर, जालिंदर शिंदे आदींसह शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमाकांत काटमोरे यावेळी म्हणाले की, प्राथमिक शाळेत मुलांमध्ये संस्काराची रुजवण करुन त्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. भारताला विश्वगुरू करण्यासाठी सक्षम भावी पिढी घडवावी लागणार आहे. यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. मुलांचा बौध्दिक विकास लहानपणी झाल्यास भविष्यात ही मुले पुढे जातात. जिल्हा परिषदेत शाळेतही दर्जेदार शिक्षण मिळत असून, अनेक अधिकारी वर्ग या शाळेतून घडले. विद्यार्थी संस्कारी व गुणवत्ताधारक होतात याचे उत्तम उदाहरण मिशन आरंभ व नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद शाळेचे उल्लेखनीय यश. नेप्ती शाळेच्या शिक्षकांचे काम व शाळेचे गुणवत्ता चांगली असून या शाळेचा आदर्श इतर शाळेने घ्यावा .जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता चांगली असून पालकांनी भारताला विश्वगुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद पाठवावे असे आवाहन राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काटमोरे यांनी केले.
मुख्याध्यापिका पद्मा मांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांसाठी सीजी पावर कंपनीकडून वॉटर कुलर भेट देण्याचे भागवत यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री स्वच्छ शाळा पुरस्कारातंर्गत नेप्ती प्राथमिक शाळेला तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाच्या रुपाने एक लाखाचे बक्षीस मिळाल्याबद्दल काटमोरे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
गावातील ग्रामस्थांसाठी मुलांचे कलागुण पाहण्यासाठी कार्यक्रमाचे एलईडी वॉलवर प्रेक्षेपण करण्यात आले होते. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध हिंदी-मराठी गीतांवर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पंजाबचा भांगडा नृत्य, शिवकन्या आंम्ही आदी गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद, रामदास फुले, दत्ताभाऊ कांडेकर, पोपट मोरे, तुषार भुजबळ, अनिल पवार, बाळासाहेब नवले, योगेश पवार, सुभाष मांडगे, मंदार लोकरे, संजय शेलार, राजश्री कोल्हे, मिरा जयकर, कविता कर्पे, सोनाली कदम विशेष सहकार्य मा. जि .प. सदस्य सदस्य अरुण होळकर, मा.उपसरपंच फारुख सय्यद , ग्रामसेवक शेख भाऊसाहेब ,चेअरमन विलास जपकर ,आयुब सय्यद अभिजीत औटी,
सागर गाडेकर, बाबा पवार सर, बाळासाहेब कापसे शिक्षक बँक संचालक विकास डावखरे, गहिनीनाथ पिंपळे,संतोष गवळी, बाळासाहेब वाबळे, किशोर जाधव ,राजू झावरे , रूपाली गवळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वाळके यांनी केले. आभार सुरेश कार्ले यांनी मानले.