इतर
नेप्ती येथील सत्तार सय्यद यांचे निधन

अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते सत्तार दगडू सय्यद यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
जनसामान्यांच्या सुखदुःखात ते नेहमी तत्पर असत. ते हसतमुखत व मनमिळावू स्वभावाचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या मागे आई,दोन बहिणी ,पत्नी, परवेज़ सय्यद व आवेज सय्यद ही दोन मुले व एक मुलगी आहे .जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.