इतर

नागराज मंजुळे यांच्या हस्ते अरविंद गाडेकर सन्मानित


संगमनेर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित विवेक रेषा व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालत पुणे येथे नागराज मंजुळे ( दिग्दर्शक व कलाकार) यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी स्पर्धेत विजेते संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांना सन्मानपत्र देऊन नागराज मंजुळे यांनी सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर अरविंद जगताप (पटकथा लेखक व नाटककार), मंजुल ( प्रसिद्ध व्यंगचित्रकार) , अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र च्या मुक्ता दाभोळकर, या व्यंगचित्राचे संयोजक गौरव सर्जेराव या मान्यवरांच्या उपस्थितीत हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या व्यंगचित्र प्रदर्शनात भारतातील 150 व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.अरविंद गाडेकर यांनी स्पर्धेत भाग घेऊन उत्तेजनार्थ
बक्षीस मिळविले. या कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर, दीपक गिरमे तसेच महाराष्ट्र भरातून आलेले अंनिस कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रभरातून विविध विभागातून आलेले व्यंगचित्रकार व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, “व्यंगचित्र हे असे माध्यम आहे जे मार्मिक चिमटे काढीत उणीवा शोधते आणि व्यवस्थेला जाग

आणण्याचे काम करते. विवेक विचारांची जागृती करण्याचे हे व्यंगचित्र प्रदर्शन करत आहे. देशाचे व समाजाचे चित्र नेमके कुठे बिघडले हे व्यंगचित्र दाखवते आणि वास्तवाचे प्रकटीकरण करते. व्यंगचित्राला
कोणताही फिल्टर नसतो. “
यावेळी स्पर्धेत विजेत्यांना नागराज मंजुळे यांचे हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. संगमनेर साहित्य परिषदेचे रमेश सराफ, कैलास कुऱ्हे, शेख ईद्रीस, असिफली सय्यदअली पठाण, बाळकृष्ण महाजन, दिलीप उदमले, अडव्होकेट हेरंब महाजन हे संगमनेरहून उपास्थित होते. व्यंगचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button