श्री संगम पतसंस्थेच्या चेअरमनपदी किसन भाऊ हासे व्हाईस चेअरमनपदी जयंत नवले यांची निवड

संगमनेर – येथील श्री संगम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कासारा दुमाला कार्यालय विद्यानगर संगमनेर या संस्थेची सन 2025 ते सन 2030 ही पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी सातव्यांदा किसन भाऊ हासे व व्हा.चेअरमनपदी श जयंत बाबुराव नवले यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थेची स्थापना 1997 साली दैनिक युवावार्ताचे संस्थापक, संपादक किसन भाऊ हासे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली झाली. सभासदांचा विश्वास, ठेवीदार, कर्जदार यांच्या हिताचे रक्षण याला प्राधान्य देत संस्थेने यशस्वी वाटचाल केली. सुमारे आठ कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेली संस्था असून विनम्र व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यामुळे संस्थेने आपला लौकिक कायम ठेवला आहे.
संस्थेच्या निवडणूकीची बिनविरोध परंपरा याही वर्षी कायम ठेवत किसन भाऊ हासे, जयंत बाबुराव नवले यांची अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणून निवड करून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयाचे डी.डी. वाकचौरे यांनी काम पाहिले. या प्रसंगी संचालक बळीराम बिल्लाडे, अरुण शहरकर, छाया जाधव, राजश्री दुर्गुळे, अनिल रहाणे, दत्तात्रय गुंजाळ, यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. नुतन पदाधिकार्यांचा यावेळी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे व्यवस्थापक रावसाहेब हासे, कर्मचारी अश्विनी सातपुते, अक्षय सातपुते, प्रियंका नवले यांनी याप्रसंगी सहकार्य केले.