अमृतवाहिनी आयटीआयच्या 92 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी थेट निवड

संगमनेर (प्रतिनिधी) माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय ने महाराष्ट्रातील विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी समन्वय केला असून यावर्षी 92 विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेपूर्वीच विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट संधी मिळाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे
याबाबत अधिक माहिती देताना भाटे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा.आ. डॉ. सुधीर तांबे व कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय ने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या थेट संधी मिळाव्या याकरता महाराष्ट्रातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या वतीने समन्वय केला जात आहे. नुकताच महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक रिंग प्लस ऍक्वा सिन्नर या दोन कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू संपन्न झाला यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा चे मॅनेजर अमोल देवरे ,रिंग प्लस एक्वा चे अमेय पंत, युवाशक्ती फाउंडेशनचे प्रणव जाधव, नवनाथ भराडे यांनी फिटर, इलेक्ट्रिशियन ,मेकॅनिक मोटार व्हेईकल ,मेकॅनिक डिझेल ,वायरमन या ट्रेड च्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली यापैकी 92 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड केली आहे.
अद्यावत सुविधा निसर्गरम्य वातावरण गुणवत्ता उत्कृष्ट निकाल आणि प्लेसमेंट ची सुविधा यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या सर्व स्टाफ ने विशेष परिश्रम घेतले.
या सर्व विद्यार्थ्यांचे लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य विलास भाटे यांनी अभिनंदन केले आहे.