धार्मिक

संगमनेरला हनुमान जन्मोत्सवानिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन


संगमनेर : जय बजरंग कट्टा आरगडे गल्ली संगमनेर आयोजित श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवार दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण तसेच रविवार दि. १३ एप्रिल रोजी झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार प्रवीण महाराज होळकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजीक असलेल्या मारुती मंदिर व चावडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ८ वाजता हनुमान चालीसा पठनाचा सामुदायिक कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर रविवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार प्रवीण महाराज होळकर शिरूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल सातपुते, उपाध्यक्ष मच्छिंद्र आरगडे, खजिनदार बाळासाहेब आरगडे, सदस्य रामदास राहणे, सयाजी सातपुते, बजरंग कट्टाचे सदस्य संकेत आरगडे, अनुज अरगडे, प्रवीण आरगडे, सचिन आरगडे, योगेश महाले, सुरज छाबडा, ओंकार अरगडे, विवेक वर्मा, शुभम लोखंडे, संकेत घोडेकर, संभव लोढा, शांतीभाई पटेल आदींनी केले आहे.


आरगडे गल्लीत असणाऱे मारुती मंदिर हे शहरातील पुरातन मंदिर असून या मंदिराचा इतिहास नवसाला पावणारा मारुती असा आहे. याचा अनुभव समाजातील सर्व स्तरातील भक्तगणांना आला आहे. त्यामुळे दररोजच या मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी शहर आणि तालुक्यातील भक्तांची येथे गर्दी होत असते. या मंदिराची सेवा नित्यनेमाने करणारे मारुती भक्त बाबाजी आरगडे येणाऱ्या भाविकांचे आनंदाने स्वागत करत असतात. याच ट्रस्टच्या माध्यमातून बजरंग कट्टा हनुमान भक्तांनी बस स्थानक परिसरात पानपोई सुरू करून तहानलेल्यांची तहान भागवण्याचे काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button