महात्मा फुले यांनी शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवली- तन्मय पुंड

नेप्तीत समता परिषदेच्या वतीने फुले जयंती साजरी.
अहिल्यानगर :प्रतिनिधी- नगर तालुक्यातील नेप्ती येथील संत सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सकाल माळी समाज ट्रस्ट ,सावता महाराज तरुण मंडळ व ग्रामस्थाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सामाजिक कार्यकर्ते , सनदी लेखापाल तन्मय पुंड यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले ,शाखा अध्यक्ष शाहू होले , माजी सरपंच अंबादास पुंड, संजय जपकर, दिलीप होळकर, देवा होले ,तन्मय पुंड, शिवाजी होळकर, उपसरपंच जालिंदर शिंदे, प्रा. एकनाथ होले, प्रा. भाऊसाहेब पुंड, भानुदास फुले, युवा कीर्तनकार आकाश महाराज फुले ,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, संतोष चौरे , सुरेश कदम, रवी पुंड, बाळासाहेब बेल्हेकर, संभाजी होले, दगडू होळकर,सचिन पुंड ,सुभाष नेमाने ,बाजीराव वाघाडे, अनिल पंडित ,नानाभाऊ इंगोले, कुमार जपकर, आदित्य पुंड , राज बेल्हेकर ,कृष्णा शेरकर, आयुष राऊत ,सौरभ भुजबळ व परिसरातील समता सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत देशात महात्मा फुले यांनी शिक्षणाचा प्रचार केला. माळी समाज हा महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले व सावता महाराज यांच्या विचारावर चालणारा समाज आहे .महात्मा फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली त्यामुळे मी सीए झालो.अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्या समतेच्या विचाराचा जागर त्यांनी केला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. त्यांच्यामुळेच महिला डॉक्टर , वकील, राष्ट्रपती झाल्या. त्यामुळे भारत देशात महात्मा फुले यांनी शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवली असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते, सनदी लेखापाल तन्मय पुंड यांनी केले.
महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली .त्यांनी तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण देण्याचे महान कार्य केले त्यामुळे महात्मा फुले यांचे कार्य विसरू नका असे प्रतिपादन समता परिषदेचे तालुकाप्रमुख रामदास फुले यांनी केले.