शिवप्रताप दिनानिमीत्त शिर्डीत रक्तदान शिबीर

शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारत भरती, शिर्डी, जनकल्याण रक्तपेढी व साईबाबा संस्थान रक्तपेढीच्यावतीने छत्रपती शिवप्रताप दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात तब्बल १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सोमवार ९ डिसेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गजानन शेर्वेकर, भारत भरतीचे शहराध्यक्ष नरेश पारख, रेखा वैद्य- रणमाळे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी दिपेश वैद्य, विनायक रत्नपारखी, सुनील सोनवणे, विशाल कोळपकर, सुभाष यादगुडे, महेश कवडे आदींची उपस्थिती होती. सायंकाळपर्यंत या शिबिरात एकशे आठ तरुणांनी रक्तदान केले.