नेप्तीत हनुमान जयंती साजरी .रावणासारख्या दृष्ट शक्तीच्या विरुद्ध हनुमान संयमाने लढले :रामदास फुले

अहिल्यानगर: प्रतिनिधी
-नगर तालुक्यातील नेप्ती येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर सेवेकरी मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
हनुमान जयंतीनिमित्त दक्षिण मुखी हनुमान मंदिर सेवेकरी मंडळांनी हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करून स्वच्छतेचा संदेश दिला .मंदिरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या तसेच मंदिरामध्ये फुलाची आकर्षक सजावट करून मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती .
नेप्ती भजनी मंडळाचा पहाटे भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर देवाला शाही स्नान घालण्यात आले .सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान उत्सव साजरा करण्यात आला ग्रामपुरोहित श्री. चंद्रकांत औटी ( देवा) याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. वैभव बेलेकर यांनी देवास रुद्राभिषेक घातला . सामुदायिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.५६ भोग व ११ फलभोगाचा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला . महाआरतीचा कार्यक्रम झाला . त्यानंतर भाविकांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळपासून भाविकांनी हनुमान मंदिरा दर्शनासाठी गर्दी केली होती .गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली
हनुमान जयंती हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे. ग्रामस्थ नेहमी हनुमान जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करतात. हा सण केवळ उत्सव नाही तर आपल्या कर्तव्यातून जीवन कसे जगावे हे शिकवतो. हा सण सर्वजण एकत्र येऊन करतात त्यामुळे समाजात शांती व बंधुभाव वाढतो .या धर्तीवर सात चिरंजीवांपैकी एक चिरंजीव हे श्रीराम भक्त हनुमान आहेत .हनुमान हे महारुद्राचा अकरावा आवतार आहे. हनुमान यांच्या वडिलांचे नाव केसरी असून आईचे नाव अंजनी आहे. हनुमान रावणासारख्या दुष्ट शक्तीच्या अन्यायविरुद्ध संयमाने लढले
रामदास फुले
समता परिषद तालुका अध्यक्ष

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवेकरी मासिक देणगीदार श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर तुषार भुजबळ,ओंकार भुजबळ, शशिकांत होले, सौरभ भुजबळ, बंटी मोरे , संभा राऊत, शिवम रावळे,
हर्षल चौरे, वैभव बेल्हेकर, समर्थ जवणे, टिल्लू जवणे,
पितांबर जवणे, प्रशांत रावळे, सत्यम रावळे,
आयुष राऊत, लखन शेरकर, कृष्णा गव्हाणे, सोहम करपे, सोमनाथ जपकर, यांनी परिश्रम घेतले .
यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, नारायण औटी देवा, पाराजी चौरे , दत्तू कांडेकर, शोभा औटी,वंदना औटी,अभिजीत औटी, मीनल औटी, अक्षय औटी, चैताली औटी, अमोल औटी, अश्विनी औटी, श्राव्या औटी, शौनक औटी, बाबासाहेब भोर, रोहन देशपांडे, दुर्गेश कुलकर्णी, बबन शिंदे, बबन बेल्हेकर, तुकाराम चौरे, बाबासाहेब रावळे,राधू जपकर, सीताराम होळकर, सीताराम शिंदे, रावसाहेब पुंड अनिल चहाळ व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.