केडगाव मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात!

अहमदनगर प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केडगावमध्ये शुक्रवारी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केडगाव येथील महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या महिला जिममध्ये गेल्या तीन महिन्यांपासून आहारतज्ज्ञ आणि योग शिक्षिका ज्योती येणारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला योगाचे धडे गिरवीत आहे. यावेळी महिलांनी योगा करुन निरोगी आरोग्याचा संदेश दिला.
सावेडी येथील कर्मयोगी स्टुडिओच्या योगा थेरपीस्ट गायत्री गरडे यांच्या अधिपत्याखाली आता केडगावमध्ये महिलांना योगाचे धडे देण्यात येत आहे. यावेळी महिलांना मार्गदर्शन करतांना ज्योती येणारे म्हणाल्या की, निरोगी जीवनासाठी योग सर्वोत्तम ठरत असून, संपूर्ण जगाने भारताच्या योगाचा स्वीकार केला आहे. योगाने अनेक आजार, विकार बरे होऊन आनंदी जीवनाचा लाभ घेता येतो. अनेक दुर्धर व्याधींवर योग-प्राणायामाद्वारे मात करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वसुधा दहातोंडे, शितल कोतकर, नीता चौधरी, चारू अहिरे, मेघा कावरे, निर्मला मगर, नेहा ओझा, सुवर्णा आढाव, सारिका वाघ, नयना पाळेकर, अर्चना गोडसे, वैशाली वाघ, प्रीती गुंजाळ, जयश्री मेढे, विजया पाटील, रजनी तांदळे, सुवर्णा चोरडिया, वर्षा ओसवाल, लता सातपुते, दिपाली भिंगारदिवे, केतकी पाळेकर, पूनम देशमुख, सुनीता सातपुते, संगीता गोरे, वैशाली तळेकर, कल्पना पातारे, या महिलांची उपस्थिती होती.
दररोज एकतास तरी योगसाधनेचा अभ्यास करावा ः ज्योती येणारे
आजच्या धका-धकीच्या जीवनात योग साधनेला खूप महत्त्व आलेले आहे. महिलांमध्ये पीसीओडी, मासिक पाळी, थायरॉईड डायबिटीस, बीपीचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करतांना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ताण-तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज किमान एक तास तरी योग साधनेचा अभ्यास करावा. योगामुळे मन स्थिर राहते, आणि मानसिक संतुलन चांगले राहते. सकारात्मकता वाढल्यामुळे आरोग्य सुधारते आणि हार्मोन्स स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे दररोज किमान एक तास तरी योगा करावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्योती येणारे यांनी केले
