कोकणवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

अकोले प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोकणवाडी गावातील आदिवासी बांधवांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली.”
समाजाला बाबासाहेबांच्या विचारांची, संविधानाची गरज आहे. संविधानातील आरक्षणामुळेच एस सी एस टी समाजातील बांधवांना नोकऱ्या मिळाल्या आहेत म्हणून बाबासाहेबांचे उपकार विसरता कामा नये. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे तत्व अंगी बाळगून एक गाव एक विचार ही गोष्ट लक्षात घेऊन आपापसातील वादविवाद विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे, ” असे यावेळी परिवर्तन कमिटीचे संस्थापक श्री नवल चौरे यांनी सांगितले
जि प प्राथमीक शाळेच्या सौ देशमुख मॅडम यांनी बाबासाहेबांचा इतिहास सांगितला. सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मेमाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग, संघर्ष, कार्य, शौर्य आणि पराक्रम तसेच त्यांना आपण डोक्यावर घेऊन का नाचतो हेही सांगितले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता सांगून त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला अभिवादन केले.
प्रा. श्री अनंत सक्सेना मुंबई यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ सुलोचना जाधव, द्रोपदा जाधव, तृप्ती चौरे, बहिरू गायकवाड, नारायण जाधव, परिवर्तन कमिटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष तुकाराम जाधव, सचिव महेंद्र जाधव, सदस्य शंकर जाधव, कैलास जाधव, नामदेव जाधव, हिरामण जाधव, विकास जाधव, देविदास जाधव, भाऊराव जाधव, सुदर्शन गोडे, गुलाब बेंडकोळी, दीपक जाधव, दिनेश जाधव, एकनाथ चौरे, अजीम सर, संतु जाधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानदेव दत्तू जाधव यांनी केले तर श्री ज्ञानेश्वर विष्णू जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.