
सोनई–सोनई येथील महादेव मंदिर च्या परिसरातील हनुमान मंदिरात भगवान विश्वकर्मा यांची जयंती विधिवत पूजेने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महंत सुनीलगिरीजी महाराज,महंत गोपालगिरीजी महाराज,ह.भ.प.जरे महाराज,व ह.भ.प.माऊली महाराज मोरे (ब्राह्मणी),ह.भ.प.भगवान महाराज बोरुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी सांगितले की,समाज संघटन करून हिंदू धर्म प्रमाणे धार्मिक कार्यक्रम केले तर एक जीवनातील नवचैतन्य प्राप्त होते, प्रत्येकानी रोज १० रुपये देवाच्या कार्यसाठी टाकले तर १५ समाजबांधव दरवर्षी मोठा कार्यक्रम करू शकतो, असे आवाहन करातच समाजाने हा संकल्प भाविकांनी हात वर करून केला.
सुतार, लोहार संघटनेचे पंडितराव सोनवणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र राज्यचे हिंदू धर्म स्वाभिमान परिषदेचे व सुतार संघटनेचे कार्यकर्ते कृष्णां बार्वेकर यांनी भगवान विश्वकर्मा सुंदर अशी माहिती व पांचाळ समाजाची विशद केली.
ओंशांति सोनई केंद्राच्या इंदूताई आगळे ,दिलीप आगळे,पारसनाथ आगळे,पत्रकार कृष्णां आगळे,यांनी मान्यवर यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकार विजय खंडागळे, श्रावण बाळ माता पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, बंटी परदेशी,सागर आगळे,आप्पा आगळे, यांचेसह आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सुतार,लोहार बांधवांनी विषेश परिश्रम घेतले. आभार पंडित सोनवणे यांनी मानले.