डॉ.आंबेडकरांनी वंचितासाठी आयुष्य समर्पित केले- विशाल कदम

नेप्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी .
अहिल्यानगर: प्रतिनिधी
-नगर तालुक्यातील नेप्ती येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले यांची जयंती भीम ज्योत मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
माजी सरपंच संजय जपकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नगर तालुका उपाध्यक्ष विशाल कदम व समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला . डॉ.आंबेडकर जयंती निमित्त महिलांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या .
नेप्ती ग्रामपंचायत मध्ये सुद्धा डॉ.आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच ,तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ .आंबेडकर यांनी भारतीय कामगार परिषदेच्या सातव्या अधिवेशनात कामाचे तास १२ वरून ८ तास केले . महात्मा फुले यांचे धोरण तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे अशी धारणा आंबेडकर यांची होती . आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला . शिक्षणाची गरज पसरवण्यासाठी आणि कमी उत्पन्न गटाची आर्थिक स्थिती समृद्ध करण्यासाठी त्यांनी दलितांच्या शिक्षण आणि मूलभूत कल्याणासाठी काम केले .त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशातील कोटी कोटी वंचित घटकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नगर तालुका उपाध्यक्ष विशाल कदम यांनी केले.

महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते .महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्यात वैचारिक नातं होत .महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाड्यातून दिले त्यांची व आपल्या गुरु विषयी कृतज्ञता म्हणून डॉ.आंबेडकर यांनी संविधान ३९५ कलमाचे लिहिले. भारताचे पहिले कायदामंत्री डॉ. आंबेडकर होते .त्यांच्या काळात त्यांनी विविध कायदे आणि सामाजिक सुधारण्याचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी बजावली .संविधानाच्या मसुदा समितीवर सात जणांची निवड करण्यात आली होती .त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला .एकाचा मृत्यू झाला .एक विदेशात गेला .एकाची तब्येत ठीक नव्हती. एक राजकारणात अडकला त्यामुळे मसुदा समिती अध्यक्ष म्हणून संविधान लिहिण्याची सर्व जबाबदारी डॉ.आंबेडकर यांच्यावर येऊन पडली व त्यांनी समर्थपणे एकट्याने पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे खरे शिल्पकार आहेत त्यामुळे संविधानाला कोणी हात लावू नये असे प्रतिपादन रामदास फुले यांनी केले.