‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ ही दुरूस्ती करून राज्याने तात्काळ केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा,

अहमदनगर -धनगर समाजाला अनुसुचित जमातिचे आरक्षण मिळावे, अहमदनगर जिल्हयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतर व्हावे व मेंढपाळांचे प्रश्न यासाठी सध्या जुलै २३ चालू अधिवेशनात मुद्दे उपस्थित करन्यात यावेत
धनगर व मेंढपाळ बहुल मतदार संघ असून ही जमात ७० वर्षापासून अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकिय विकास खुंटलेला आहे तसेच मेंढपाळ व मेंढयावरती बिबटयांचे हल्ले होत आहेत, त्यामध्ये मेंढपाळ व मेंढया जखमी व मरण पावत आहेत.
तरी आपण चालू अधिवेशनात मधे ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ ही दुरूस्ती करून राज्य सरकारने तात्काळ हि शिफारस व प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अहमदनगर जिल्हयाचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करावे, तसेच मेंढपाळांना सरकारने मोफत पिस्तुल व परवाना द्यावा, मेंढया व
मेंढपाळांचा विमा सरकारने स्वखर्चाने काढावा हे मुद्दे उपस्थित करून विधिमंडळात मांडून न्याय अशी मागनी
धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष . डी. आर. शेंडगे यांनी केली आहे