अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संगमनेर ( प्रतिनिधी )
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर विद्याप्रेमी होते आयुष्यभर त्यांनी ज्ञानाची उपासना केली. ज्ञानवंत असलेल्या या व्यक्तिमत्वाने निर्माण केलेली राज्यघटना ही प्रत्येकासाठी धर्मग्रंथ ठरणारा असल्याचे प्रतिपादन आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात यांनी केले आहे .
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रा मिलिंद इंगोले,प्रा विवेक कांडोरे, प्रा.जी.एल बोऱ्हाडे,प्रा.योगिता दिघे ,डी एस फापाळे, प्रा.ईश्वर फापाळे जयराज हिरे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बाबा खराब म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी पॉलिटेक्निक ने गुणवत्ता पूर्ण काम केले आहे. अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. विविध संत, समाज सुधारक यांनी मानवतेचा मंत्र दिला आहे आणि हाच मंत्र घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात काम करत आहेत. सध्या जातीभेद निर्माण केला जात आहे माणूस माणसापासून तोडला जात आहे. अशा संघर्षाच्या काळामध्ये सर्वांनी भारत देश एक मानून काम करणे गरजेचे आहे आणि याकरता विशेषता विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
गुलामगिरी मुक्त करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर यांनी काम केले मात्र आता काही जातीयवादी शक्तीचे लोक गुलामगिरी निर्माण करू पाहत आहेत. राष्ट्रपुरुषांची जीवन चरित्र हे नेहमी प्रेरणादायी असून त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा जी एल बोराडे यांनी बाबासाहेबांचे जीवन चरित्र याबाबत माहिती सांगताना त्यांच्या जीवनातील विविध अनुभव हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बोराडे यांनी केले तर प्रा योगिता दिघे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या