ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचा निरोप समारंभ

संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या एल एल बी व बी ए एल एल बी च्या २०२५ च्या बॅचचा निरोप समारंभ नुकताच दिनांक १२ एप्रिल रोजी पार पडला.
कायद्याची पदवी घेतल्यानंतर समाजात आपले स्थान; जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी वागले पाहिजे ;अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणाची कास कधीही सोडता कामा नये असे मार्गदर्शन प्राचार्य देशमुख सर तसेच डॉ.पठारे सर यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य राहुल देशमुख सर ; प्रा.डॉ. पठारे सर ; डॉ.चौरपगार सर ; देवयानी निकम मॅडम ; सोन्नर सर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांतर्फे डॉ.बोऱ्हाडे सर ;सचिन डेरे ;रमेश साळगट ,कुणाल सोनवणे तसेच पूनम जगताप सचिन भालेराव आदींनी मनोगत व्यक्त केले.प्रवीण घेगडमल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यार्थी प्रतिनिधी दिपक दिवेकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.