इतर

राजूर परिसरातील बस सेवा सुधारण्यासाठी डी. वाय. एफ. आय. युवकांचे आंदोलन!

राजूर प्रतिनिधी

डी.वाय.एफ.आय. या युवक संघटनेच्या वतीने आज दिनांक 15 एप्रिल रोजी राजुर बस स्थानक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. राजुर येथील दत्त मंदिर या ठिकाणावरून यावेळी युवकांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. राजुर व पंचक्रोशीतील विद्यार्थी, रोज शाळा, कॉलेजसाठी मोठ्या संख्येने राजूर येथे एस टी बस मधून येत असतात. मात्र या विद्यार्थ्यांना वेळेत बस न आल्यामुळे मोठ्या शैक्षणिक नुकसानास सामोरे जावे लागते. राजुर बस स्थानकाची व येथील स्वच्छता गृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सोडण्यात येत असलेल्या बसेस अत्यंत निकृष्ट व खराब आहेत. विद्यार्थी युवकांबरोबरच रोजगारासाठी व बाजारासाठी येणाऱ्या सामान्य गरीब जनतेचेही यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. डी. वाय. एफ. आय. या संघटनेने या कामी पुढाकार घेऊन आंदोलनाची हाक दिली होती. मोठ्या प्रमाणात जनतेमधून सह्या गोळा करून या आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. आंदोलनात खालील मागण्या मान्य करण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या वतीने यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

15 दिवसात अधिकच्या बस उपलब्ध होतील, फेऱ्याची जशी मागणी असेल तशा गाड्या सोडण्यात येतील, नव्या 10 बस गाड्या नवीन मिळणार, जुन पासून नवीन वेळापत्रक तयार होऊन बसेस वेळेनुसार चालु करण्यात येतील 5) पाचपट्टा घाटघर गाडी चालू करू, सुचना फलक लावण्याची जबाबदारी घेणार, गाड्याची चौकशी करूनच गाड्या पाठविल्या जातील, स्वछता गृहाची व्यवस्था करू, राजुर – पिंपरकणे – टिटवी बस चालू करण्यासाठी सर्वे झाला आहे, गाड्या उपलब्ध झाल्यास लगेच चालू होईल, बलठण बस चालु करण्याबाबद सकारात्मक चर्चा संध्याकाळी बस सोडण्याबाबद चर्चा झाली, कुमशेत गाडीबाबद चर्चा करून मार्ग काढू, अकोले – देवठाण – दोडकनदी – सावरगाव चालू करणे बाबद रस्त्याची पाहणी करून बस चालू करू असे सांगण्यात आले, कोहंडी रस्त्याचे सर्वेक्षण करून नवीन बस आल्यावर चालू होईल, पुरुषवाडी संध्याकाळी बस लगेच सोडणार या मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या.आंदोलन यशस्वी करण्यासाठी वसंत वाघ, सुनील बांडे, भीमा कोंडार,. यांनी मेहनत घेतली. एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, लक्ष्मण घोडे, कुसा मधे. यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button