अहमदनगर

साहित्य हा समाजाचा आरसा असतो — डॉ.बाबुराव उपाध्ये


राजूर: प्रतिनिधि

समाजाचे कल्याण साधते ते साहित्य. साहित्य हे मनातला माणूस शब्दांच्या रूपाने मांडण्याचे काम करते .जीवनाचे सार्थक साहित्य वाचण्यानेच होते. जो वाचन करतो तो जीवनात समृद्ध होतो असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिपादन केले.ते

ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालय राजूर येथील वाड्:मय मंडळ उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उद्घाटनपर भाषणात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते. “प्रत्येकाने आपल्या जीवनात पुस्तक रूपी मित्र संभाळल्यास जीवनात नव चैतन्य निर्माण होते. पुस्तक हे माणसाला जगण्याची उर्मी निर्माण करते ,अनेक संत,राजकीय पुढारी यांनी पुस्तकाचे वाचन केल्यामुळे त्यांना इतिहास घडवता आला.” असेही विचार डॉ. उपाध्ये यांनी यावेळी मांडले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार मा.श्री प्रकाश कुलथे हे देखील उपस्थित होते.” अलीकडील काळात वाचन हे कमी होत चालले आहे. त्यामुळे सक्षम विदयार्थी तयार होत नाहीत. सामजिक जाणीव कमी होत आहे. व आजचे तरुण हे दिशाहीन होत आहेत. यासाठी वाचन चळवळ समृद्ध करावी लागेल तसेच जीवनात संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. यशाचे शिखर गाठायचे असेल तर सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. पुस्तकाने जीवन समृध्द होते. जीवन सार्थकी लागते.” असे विचार श्री कुलथे यांनी प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ भाऊसाहेब देशमुख म्हणाले की, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सारख्या संपर्क साधनांमुळे साहित्यापासून लोक बाजूला जात आहेत. संभाषण कमी होत चालले आहे. वाचनाची ओढ दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.आनंदी जीवन जगण्यासाठी पुस्तकाला मित्र बनवा. अन्यथा स्पर्धेच्या युगात विदयार्थी मागे पडू शकतो.”अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून वाड:मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. द.के.गंधारे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाड्.मय मंडळाचे अध्यक्ष प्रा. बी.के.थोरात यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. जी.एस.कुसमुडे यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी प्रा.डॉ. आर.डी.ननावरे, प्रा.कुसमुडे, अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button