देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट भगूर नागझिरा नाल्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे…..?

नाशिक प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट भगूर रोडवरील नागझिरा नाल्यावरील पुलाचे काम ९ मार्च रोजी चालु झाले असुन सदर कामाचे भूमिपूजन आमदार सरोज बाबुलाल अहिरे यांच्या देवलाळी मतदार संघ निधीतून ठेकेदार योगेश कांदे सुयोग इन्फ्रास्ट्रक्चर नासिक यांच्यामार्फत चालू केले असून सदर कामाची क्वालिटी ही निकृष्ट दर्जाचे असून

त्यात जे काही मटेरियल वापरले गेले आहे हे त्या पुलाला अनुसरून योग्य नाही पुलाच्या काँक्रिटी करण्यासाठी १६ एम एम चे रोड वापरले पाहिजेत त्या ठिकाणी १० एम एम चे रॉड हे कॉलम साठी वापरले असून ते पुलाच्या बांधकामासाठी योग्य नाहीत. या नाल्याला पावसाळ्यात अतिशय जोराच्या पाण्याचा वेग असतो, भविष्यात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घटना घडू शकते त्यामुळे सदरचेपुलाचे बांधकाम हे योग्य नाही.
तरी ह्या पुलाचे काम हे पी डब्ल्यू डी चे अधिकारी गोमासे साहेब यांच्या अधिपत्याखाली चालू केले गेले असून या कामांमध्ये सारासार फसवेगिरी झालेली आहे तरी शासकीय अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून सदर कामावर स्थगिती आणावी कारण या पुलावरून अनेक प्रकारचे अवजड वाहने ये जा करत असतात जर हे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर हा पूल पुढील भविष्यकाळात केव्हाही कोसळू शकतो आणि मोठ्या प्रमाणात येथे हानी पोहोचू शकते तरी या कामाची चौकशी करण्यात यावी.
