लग्नाळू तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणुक करणारी टोळी, पोलीसांनी केली जेरबंद!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
दि.०१/०४/२०२३ ते दि.२८/०४/२०२३ रोजीचे दरम्यान सायगांव ता.येवला व कामठी जि. नागपुर या ठिकाणी वास्तव्य करणारे आरोपोनामे १) योगेश पोपट जठार २) अंजना योगेश जठार ३) सचिन प्रकाश निघुट ४) भाऊसाहेब दगु मुळे सर्व रा. सायगांव ता. येवला जि.नाशिक तसेच ५) शंकर जगन शेंडे रा. गोंदेगाव ता. पारशिवनी जि. नागपुर ६) दिलेश्वरी राणी रा. भांडेवाडी ता. कामठी जि.नागपुर ७) सुजाता दिलीप निर्मलकर रा. चिखली ता. कामठी ८) किरन नाना फुले रा.भांडेवाडी ता.कामदी जिनागपुर यांनी पुर्वनियोजीत कट करून, यातील तक्रारदार ज्ञानेश्वर देवराम खैरनार वय ३६ वर्ष व्यवसाय शेती रा-गारखेडा ता. येवला जि.नाशिक व इतर पिडीत साक्षीदार यांना लग्न करून देतो असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन यातील आरोपी नं.१ ते ५ यांनी मिळून यातील आरोपी क्रमांक ६ ते ८ यांचेशी विवाह करून देवून त्यांचेकडुन रोख रक्कम व सोने चांदीचे दागीने असा एकुण- ७,१३,०००/-रु.( सात लाख त्र्यन्नव हजार रुपये ) असा ऐवज घेतला. त्यानंतर यातील आरोपी नं.६ ते ८ यांनी तक्रारदार व पिंडीत यांचे घरी काही दिवस वास्तव्य केले. त्यानंतर आईची तब्येत खराब आहे. तुम्ही तुमच्या आईला भेटायला या असे नागपुर येथील मुख्य आरोपी शंकर शेंडे यांना सांगीतले. त्यानंतर संबधीत आरोपी महीला या अंगावरील दागीने घेवून नागपुर या ठिकाणी निघुन गेल्या. त्यानंतर यातील तक्रारदार यांना दोन दिवसांनीच त्यांचे पत्नी हीचे दुसरे लग्न झाल्याचे फोटो सोशल मिडीयावर दिसले. तेव्हा यातील तक्रारदार यांनी लग्न जुळविणारे एजंट व संबंधीत महोला हीस कॉल करून केव्हा येणार बाबत विचारणा केली असता यातील आरोपीनी कळविले की तुम्हीच आम्हाला आणखी पाच लाख रुपये दया नाहीतर, नम्ही कोन्या स्टॅम्प पेपरवरती करून दिलेल्या सहयाचा वापर करुन आम्हीच तुमचेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत असल्याने वरील लोकांविरुध्द येवला तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर ४३४/२०२३ भादवि कलम ३८४,४२०, ४०९,४०६,१२०, (ब) प्रमाणे दिनांक – ५/८/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, तसेच मा. श्री. अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव आणि मा. श्री. सोहेल शेख, उपविभागिय पोलीस अधिकारी, मनमाड़ विभाग मनमाड यांनी केलेल्या सूचनानुसार तसेच येवला तालुका पोलीस स्टेशनचे परिविक्षाधिन पोलीस उप अधिक्षक श्री. विशाल क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनकडील पोलीस उप निरीक्षक हर्षवर्धन बहीर, मपोना सुनिता महाजन, पोशि. आबा पिसाळ, पोशि मुकेश जाधव यांनी बारकाईने गुन्हयाचा तपास करुन गुन्हयाचा मास्टर माईंड शंकर जगन शेंडे रा. गोंडेगाव ता. पारशिवनी जि. नागपुर यास आणखी विवाहसाठी मुली पाहीजे आहेत असे कळवून फोनवरती दोन लाख रुपये दयायची बोली करुन लग्नासाठी इमी नवरदेव तयार करुन त्यास कन्हान जि. नागपुर या ठिकाणाहून वेशांतर सापळा रचुन पकडले असुन त्यास सदर गुन्हयात अटक करणेत आली आहे. गुन्हयात त्याचेकडुन ओमणी कार,मोबाईल व काही कागदपत्र जप्त करणेत आले आहेत. तसेच आरोपी योगेश जठार, सचिन निघुट व भाऊसाहेब मुळे सर्व रा. सायगांव यांना सहा. पोनि. शिंदे, पोहेकॉ ठोंबरे, पोना, बिन्नूर यांचे पथकाने सायगांव या ठिकाणाहून सदर गुन्हयात अटक करणेत आली आहे.नमुद आरोपींनी येवला व कोपरगांव तालुका या ठिकाणी असेच काही गुन्हे केल्याचे चौकशी दरम्यान कबुल केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक हर्षवर्धन बहीर हे करीत आहेत. तरी यादवारे येवला तालुका पोलीस स्टेशन मार्फत लोकांना नम्र अहवान करणेत येते की, ज्या लोकांची अशा प्रकारे फसवणुक केली आहे. अशा लोकांनी येवला तालुका पोलीस स्टेशनला संपर्क करावा.