पारनेर महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड!
दादा भालेकर:
टाकळी ढोकेश्वर:
न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, पारनेर येथील बॅचलर ऑफ व्होकेशन विभागाच्या अंतिम वर्षातील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट वर्गाच्या १० विद्यार्थ्यांची अदानी मुद्रा सोलार प्रा. लिमिटेड, गुजरात या कंपनीत निवड झाली आहे

तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वर्गाच्या ४ विद्यार्थ्यांची टी.सी.एस., बजाज फिनसर्व व आदित इन्फ्रा या नामांकित आय. टी. कंपन्यांमध्ये नुकतिच निवड झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. आहेर यांनी दिली.
सदर मुलाखतीसाठी तृतीय वर्षातील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाविद्यालयाने सन २०१८-१९ या वर्षांपासून विद्यापीठ आनुदान आयोग, नवी दिल्ली संस्थेच्या एन. एस. क्यू. एफ. योजनेअंतर्गत कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरु केले असून, त्यामाध्यमातून विधार्थ्यांचे विविध कौशल्य विकसित होऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. महाविद्यालय या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बैंगलोर,ओडिसा व पुणे अशा विविध ठिकाणी प्रशिक्षणास पाठवते. त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध होण्यास मदत होते. असे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी.आर. ठुबे यांनी सांगितले
यशस्वी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा.ए. जे. ढोले तसेच डॉ. पी. एन. पाटील, प्रा. के. एम. साबळे, प्रा. टी. के. मुजावर, प्रा. व्ही. ए. ठुबे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सेक्रेटरी जी. डी. खानदेशे, सहसेक्रेटरी अॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार मुकेश मुळे, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची क्षमता असते. या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता,आत्मविश्वास असल्यामुळेच त्यांना नवनवीन संधी सहज प्राप्त करता येतात. पारनेर महाविद्यालयाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकरी व व्यावसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत.
मा. आ. नंदकुमार झावरे पाटील
अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज,