जम्मू काश्मीर मधील गोळीबारातील निष्पाप मृत नागरिकांना सांगली त श्रद्धांजली

डॉ. शाम जाधव
सांगली– दिनांक २२ रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यात पहेलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सुमारे २६ निष्पाप नागरिक मृत झाले असून अनेकजण गंभीर झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा भाजप सांगली शहर उत्तर मंडल च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (लव्हली सर्कल)येथे जाहीर निषेध करण्यात आला
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भाजप ज्येष्ठ नेत्या निताताई केळकर, भाजप युवा नेते दिपक माने,नुतन उत्तरमंडल अध्यक्ष अमित देसाई , दरिबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, सुजित काटे, माजी नगरसेवक विलास सर्जे, अभीजीत बिराजदार ,गंगाताई तिडके, रुपाली आडसुळे,गणपती तिडके, सग्रांम घोरपडे, अशोक शिगाडे,वसंत बंडगर, संजय बंजत्री सुरेश यमगर, चेतन फोंडे, शामराव कोळेकर सुमित पडळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
