महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदिवासी सेल नाशिक जिल्हा कार्यकारणी जाहीर

नाशिक प्रतिनिधी
नाशिक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदिवासी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदिवासी सेल नाशिक जिल्हा अध्यक्ष राजू गांगड यांच्या हस्ते नाशिक जिल्हा कार्यकारणी काल जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे
श्री.सितारामभाऊ गावंडा – नाशिक जिल्हा सचिव
नानाजी गातवे – नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष
भाऊसाहेब माळी -नाशिक जिल्हा उपाध्यक्ष
सचिन सोनवणे – नाशिक जिल्हा सरचिटणीस
कृष्णा दिवे.- नाशिक तालुका अध्यक्ष
प्रविण पवार, – बागलाण तालुका अध्यक्ष,.
नानाजी गातवे, – नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष,
जालिंदर गांगुर्डे- निफाड तालुका अध्यक्ष .
विकास पागी -त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष.
प्रविण गोसावी (भील) – चांदवड तालुका अध्यक्ष
भास्कर भोये – सुरगाणा तालुका अध्यक्ष

ग्रामीण , आदिवासी भागात भौतिक दुर्गमता, गरिबी आणि प्रचलित सामाजिक पूर्वग्रहांमुळे आदिवासींना अनेकदा अडचणींचा आणि बहिष्काराचा सामना करावा लागतो. काही आदिवासींना शालेय शिक्षण पूर्ण करता येत नाहीत, बहुतेकांनी उच्च शिक्षण घेऊनही त्यांना नागरी सेवेसाठी राखीव जागा वापरता येत नाहीत.
ही एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये संपूर्ण समाज-त्याची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि भौतिक रचना-तसेच मूल्य प्रणाली आणि लोकांच्या जीवनशैलीचा समावेश होतो .आदिवासी ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहते,आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आदिवासींच्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले