
.
..
सोलापूर : पद्मशाली समाजाचे आराध्यदैवत, कुलदैवत चिरंजीव महर्षि मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने विविध आयोजन केलेल्या कार्यक्रमास सुवासिनी महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात प्रारंभी महर्षि चिरंजीव मार्कंडेय महामुनी आणि तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सचिव गणेश पेनगोंडा आणि परिवार यांच्यातर्फे ‘दुर्गा सप्तशती बीजमंत्राचे पुस्तक’ उपस्थित महिलांना मोफत देण्यात आले. त्यानंतर पुरोहित सुधीर सोमा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दुर्गा सप्तशती ग्रंथातील सातशे बीजमंत्राचे पठण’ करण्यात आले आहे. तसेच मकर संक्रांत निमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम झाल्यावर ‘वाण’ म्हणून भाजीपाल्यांचे बीया माती विरहित बाग प्रेमी ग्रुपच्या वतीने देण्यात आले. यामध्ये भोपळा, गुंज पत्ता, दोडका, शेवगा, वांगी, देव कापूस, भेंडी, पालक, कोथिंबीर आणि मेथीच्या बीया देण्यात आले होते. जेणेकरून महिलांमध्ये शुध्द आणि विषमुक्त भाजीपाला लागवड करण्याचे सवयी रुजवावे यासंबधी अधिक माहिती माती विरहित बाग प्रेमी ग्रुप संयोजिका ममता बोलाबत्तीन यांनी सांगितल्या.