पुस्तकं हे जीवनसाथी आहेत, पुस्तकं वाचन तुमच्यात चैतन्य जागविते – डॉ . अरविंद रसाळ

संगमनेर साहित्य परिषदेने जागतिक जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना परिषदेने श्रद्धांजली वाहिली. यानंतर पुस्तकांचे पूजन करून रोज पुस्तकातील दोन पानं तरी वाचावे असा संकल्प करण्यात आला. परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप उदमले प्रास्ताविक करताना म्हणाले, ” वाचन प्रकाशन आणि कॉपीराईट यांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पुस्तक दिनाची सुरुवात करण्यात आली दरवर्षी २३ एप्रिलला जागतिक वाचन संपूर्ण जगभर साजरा केला जातो. प्रत्येकाने रोज २ पाने वाचली तरी महिनाभरात एखादे चांगले पुस्तक वाचले जाईल, वाचनाने माहिती मिळते आणि मनोरंजन होते.
परिषदेच्या सदस्य अनुराधा आहेर मनोगत मांडताना म्हणाल्या, “जागतीक पुस्तक दिनाच्या निमित्ताने… हे सगळे दिन आपण युरोपातल्या लोकांनी सांगितल्या प्रमाणे साजरे करतो पण यात आपलं काय योगदान आहे. हे शोधायला हवे. आपल्या कडे नालंदा विद्यापीठ होतं ते जाळलं गेलं कस काय कुणी यात आज नको जाऊया पण जाळलं तेव्हा तेथिल पुस्तके सहा महिने जळत होते. म्हणजे इतकी पुस्तके आपणही कधी काळी वाचत होतो. तेथे दहा हजार विद्यार्थी जगभरातील शिकत होते… याचा उल्लेख ज्या चिनी प्रवासी युवान स्वांग ने केलय, त्याने भारतातून जाताना कित्येक पुस्तके आपल्या पाठीवर लादून चिनला नेले. तिथे इतर लोकांना शिक्षणासाठी त्याचा उपयोग करुण दिला. याचा उल्लेख त्याच्या प्रवास वर्णनात आलेला आहे…असो आपल्यालाही वाचनाची परंपरा आहे… या वर्षीच्या म्हणजे 2025 च्या पुस्तक दिनाचे ब्रीदवाक्य आहे… ‘जमेल तसं वाचा ‘ त्याप्रमाणे आपण कादंबरी नाही तर कथा कथा नाहीतर कविता नाहीच जमलं तर भेळीचा कागद तरी वाचावा.”

परिषदेचे पदाधिकारी शशांक गंधे म्हणाले, “
“जागतिक पुस्तक दिन. युनेस्को द्वारे या दिवशी स्पर्धा घेतली जाते. याचा मूळ उद्देश वाचनाची आवड निर्माण व्हावी हा आहे. आपल्याला आयुष्याच्या वाटेवर मद्दालये विद्यालये, ग्रंथालये भेटतील. कुठे थांबायचे हे आपण ठरवायचे. वाचन म्हणजे प्रगती, वाचन म्हणजे शिक्षण, वाचन म्हणजे विकास ,वाचन म्हणजे ज्ञान .आज पुस्तकांची जागा मोबाईलने घेतली आहे .तुम्ही वाचक आहात का की तुम्ही फक्त मोबाईल बघता हाही प्रश्न यानिमित्ताने आपण स्वतःला विचारला पाहिजे. पुस्तक भविष्यकाळ आणि भूतकाळातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात.”
परिषदेचे पदाधिकारी सुरेश परदेशी म्हणाले, “पुस्तकं वाचल्याने तुमचे जीवन समृद्ध तर होतेच शिवाय तुम्हाला सजग बनवते. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात कसे वागावं हे देखिल शिकवते.”
यावेळी परिषदेचे दर्शन जोशी म्हणाले, ” पुस्तकं ही आपले मित्र आहेत, ‘वाचाल तर वाचाल’, म्हणून पुस्तकं वाचली पाहिजेत.”
संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर म्हणाले “संगमने साहित्य परिषदेमध्ये पसायदान वाचनालय आणि वाचन मंडळ या उपक्रमाबरोबरच इतरही उपक्रम अतिशय उत्साहाने आपण साजरे करतो, यावेळेस आपला सहभाग जास्तीत जास्त या उपक्रम मध्ये असावा आणि वाचनालयाचा सभासदांनी लाभ घ्यावा.”
अध्यक्षीय भाषणात डॉ.अरविंद रसाळ म्हणाले की “संगमनेर साहित्य परिषदेचे उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे, पुस्तकांचा घरामध्ये असणारा संग्रह हा माझा सोबती बनला आहे त्यामुळे पुस्तका वाचून मला जराही करमत नाही. पसायदान वाचनालय आता अधिक समृद्ध होत आहे.”
सागर पन्हाळे आणि रवी पर्बत यांनी संगमनेर साहित्य परिषदेमध्ये नवीन सभासदत्व स्वीकारले त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमांमध्ये परिषदेचे सचिव ज्ञानेश्वर राक्षे आणि ईशान संगमनेरकर यांचे तर्फे ईद्रीस शेख यांनी पसायदान वाचण्यासाठी ग्रंथदान केले.
या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे पदाधिकारी महेश गोडसे यांनी केले, आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर राक्षे यांनी केले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
