भेंडा येथे निमित्त पशुधन व्यवस्थापन शिबीर संपन्न.

माकां प्रतिनिधी
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर, व पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी संलग्न श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, ज्ञानेश्वरनगर,भेंडा येथे दिनांक १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पशुधन व्यवस्थापन संबंधित शिबीर व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी डॉ.चंद्रशेखर गवळी, कृषि विज्ञान केंद्र,दहीगाव ने यांनी पशुसंवर्धन काळाची गरज व लंम्पी लसीकरण याविषयी सखोल मार्गदर्शन केले व उपस्थीतांचे शंका निरसन केले. तसेच डॉ.शरद शिंदे यांनी अंड्याचे आहरातील महत्व व रेबीज याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री.सोपान मते यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.या कार्यक्रमासाठी ६० विद्यार्थी व २० पालक शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक श्री.अभिजित भणगे, श्री.पवार भागवत, श्री.गौरव ठुबे, श्री.प्रमोद बर्डे, श्री.काकासाहेब उकिर्डे व डॉ.कृष्णा चामुटे श्री,अशोक मासाळ,श्री.वाबळे आदित्य यांनी परिश्रम घेतले.