वादळी वाऱ्याने झाड अंगावर पडल्याने शेकऱ्याचा मृत्यू

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळस बू येथे वादळी वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रोड वर झाड अंगावर पडून श्री. शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा मृत्यू झाला .
काल बुधवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान पावसाचे वातावरण झाल्यामुळे शेतात असणारे कांदे झाकण्यासाठी आपल्या मोटारसायकल वरून सुने सहित शिवाजी वाकचौरे हे जात होते. वादळ सुटल्याने जोरदार वाऱ्याने कोल्हार घोटी मार्गा लगत असणारे महारुक चे मोठे झाड त्यांच्या अंगावर पडले. सुदैवाने सुनेला काही झाले नाही. त्यात शिवाजी वाकचौरे यांना डोक्याला मार लागला त्यांना संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
कळस येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचे पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.
———-