निळवंडे कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू!

अकोले /प्रतिनीधी
-निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात पोहायला गेलेल्या परखतपूर येथील तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सुगाव बुद्रूक शिवारात घडली.
या घटनेमुळे परखतपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . गणेश भाऊसाहेब वाकचौरे(वय 40,रा.परखरपुर, ता.अकोले) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे .
सदर युवक हा अमृतसागर दूध संघ अकोले येथे बॉयलर ऑपरेटर म्हणून सेवेत होता. निळवंडे धरणातून सध्या डाव्या व उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. गणेश वाकचौरे हा युवक आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी कालव्यात गेलेला असताना त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याची गाडी व कपडे हे परखतपूर येथील पाटाच्या कडेला सापडले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.
त्याचा मृतदेह हा सायंकाळी पाण्यातून बाहेर काढला. त्याचा मृतदेह कोतूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवीण्यात आला आहे.उद्या शुक्रवारी त्याच्या सख्ख्या चुलत बहिणीचे लग्न होते .या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.