इतर

नेप्ती विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात!


अहिल्यानगर /प्रतिनिधी-

नगर तालुक्यातील नेप्ती विद्यालयाच्या 2004 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल दोन दशकांनंतर विद्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा त्या निरागस आठवणी जाग्या झाल्या. बालपणाच्या गोड वळणांवर नजर फिरवत, जुन्या शालेय जीवनातील आठवणीशी माजी विद्यार्थी पुन्हा एकरूप झाल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली


स्नेहमेळाव्याचा शुभारंभ विद्यालय भेटीने झाला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील एका हॉटेलमध्ये रंगतदार गेट टु गेदरसाठी एकत्र आले. कार्यक्रमाला विद्यालयातील तत्कालीन मुख्याध्यापक महेश जाधव तसेच इतर मान्यवर शिक्षक दत्तात्रय शिंदे, अरुण दळवी, श्रीकांत वाखारे, नानासाहेब घोडके, भास्कर कडूस, बाळासाहेब शेटे, कालिदास बडे, तुळसाबाई कदम, बाळासाहेब काळे, संजय ठोकळ, बाबासाहेब भोर, राजेंद्र झावरे, गोरख कोतकर, संतोष खरमाळे या सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शाळेतील दिवसांची आठवण करून दिली. सर्व गुरुजनांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या भावनिक कार्यक्रमात माजी विद्यार्थी कै. दिगंबर ठुबे आणि कै. माया इंगोले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमात हास्यविनोद, कविता गायन, गाणी, खेळ, जुन्या फोटोंची झलक, स्मरणिका सादरीकरण यांसारख्या गोष्टींमुळे वातावरण हलकंफुलकं आणि उत्साही राहिलं. काही विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव शेअर करत पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी विचार सांगितले. शेवटी सर्वांनी मिळून वृक्षसंवर्धन, शाळेसाठी निधी उभारणी, गावाचा विकास आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा संकल्प केला. केवळ स्नेहमेळावा न राहता हा एक सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवणारा कार्यक्रम ठरणार असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button