देशाला मैत्रेयी , गार्गी अशा ब्रह्मवादिनींची महान परंपरा ‘ : कुलगुरू डॉ . ज्ञानदेव म्हस्के

अकोले : प्रतिनिधी
‘ रयतेमधून नव्या युगाची जडणघडण होताना , कर्मवीरांची प्रेरणा नवीन पीढिला आहे . अक्षरत्वाचे मोल समजून घेतल्यास क्षरत्व लोपते . नवीन पहाटेची यशस्वीता माणसाला दिशा देऊ शकते , अशावेळी विचारांचे प्रभुत्व सिद्ध करावे ‘ , असे प्रतिपादन सातारा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . ज्ञानदेव म्हस्के यांनी केले . अगस्ती महाविद्यालयातील ४९ व्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते . अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा अकोले ता . एज्युकेशन संस्थेचे कायम विश्वस्त वैभवराव पिचड होते .
प्राचीन ऋषिपत्नींच्या विद्वत्तापूर्ण कर्तबगारीचा मागोवा घेताना कुलगुरू डॉ . म्हस्के पुढे म्हणाले , ‘ भारताला जसा सप्तर्षींचा महान वारसा आहे तसाच अगस्त्य पत्नी लोपामुद्रा , मैत्रेयी , गार्गी , अनसूया या ब्रह्मवादिनींची देखील थोर परंपरा आहे . स्वतंत्र विचारसरणीचा सक्षम पाठ या ऋषी पत्नींनी अखिल मानवजातीला अन् विश्वाला दिला आहे . ज्ञान – विज्ञान , तंत्रज्ञानाबरोबरच आत्मीय शोध आवश्यक आहे . अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाताना ‘ मी कोण आहे ? मी काय केले पाहिजे ? ‘ हा न संपणारा शोध विचारात घ्यावा लागेल . माणसे समजून घेणे , माणसं वाचणे नव्या युगाची गरज आहे . परिस्थितीतील कार्यकारण भाव समजून घेणे हीच संशोधनाची दिशा ठरते . ‘

पन्नास वर्षातील अकोले एज्युकेशन संस्थेच्या तसेच अगस्ती महाविद्यालयाच्या दैदिप्यमान वाटचालीचा मागोवा घेताना कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभवराव पिचड म्हणाले , ‘ कठोर परिश्रमातून शिक्षणप्रेमी धुरिणांच्या स्वप्नांना योग्य दिशा प्राप्त झाली आहे . जलनायक तथा कार्य . विश्वस्त कै . मधुकरराव पिचड यांनी सातत्याने ‘ जो गुणवत्ता आणि ज्ञान सिद्ध करेल तोच पुढे जाईल ‘ हे भान दिले . जाणीव दिली . स्पर्धेच्या युगात तरुण पीढिला जिद्द असणे आवश्यक आहे . महाविद्यालयाच्या अलीकडील वेधक जडणघडणीत प्राचार्य डॉ . भास्कर शेळके तसेच कुशल प्राध्यापक वर्गाचे श्रेय मोलाचे आहे . सहभागाची तसेच एकजूटीची गरज नव्या युगात अधिक आहे . ‘प्राचार्य डॉ . भास्कर शेळके स्वागत व प्रास्ताविकात संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा मागोवा घेताना म्हणाले , ‘ आदरणीय माजी मंत्री कै . मधुकरराव पिचड यांना महोत्सव काळातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा जीवन साधना पुरस्कार प्राप्त झाला ही संस्था आणि महाविद्यालयासाठी भूषणावह बाब ठरली . ‘
प्राचार्य डॉ . भास्कर शेळके यांनी त्यांचे चिरंजीव कै . डॉ . अविनाश शेळके यांच्या स्मरणार्थ कायम ठेवीतून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांसाठी जाहीर केलेल्या स्मृती पुरस्कारांचे वितरण कुलगुरू डॉ . ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले . डॉ . अशोक दातीर , डॉ . महेजबीन सय्यद , प्रा . प्रदीप बच्छाव , डॉ . साहेबराव गायकवाड , प्रा . विवेक वाकचौरे , डॉ . सचिन पलांडे , डॉ . राहूल भोसले , डॉ . पंकज नाईकवाडी इ . प्राध्यापकांसह निवृत्त उपप्राचार्य डॉ . सुनील शिंदे यांनी ‘ सुवर्ण अगस्त्य ‘ तसेच ‘ कळसूबाईचा शिखरयात्री ‘ या स्मरणिकांचे केलेल्या साक्षेपी संपादनाबद्दल त्यांचा कुलगुरू डॉ . म्हस्के यांच्या हस्ते कै . डॉ . अविनाश भास्कर शेळके स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
संस्थेचे अध्यक्ष इंजि . सुनील दातीर आणि सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी महाविद्यालयाच्या गगनभरारीचा साक्षेपी आढावा मनोगतात घेतला . याप्रसंगी अकोले एज्युकेशन चे कायम विश्वस्त , माजी आमदार वैभवराव पिचड , गिरजाजी जाधव , स्वीकृत विश्वस्त मधुकरराव सोनवणे , सुरेश कोते , संपतराव वैद्य , खजिनदार धनंजय संत तसेच सर्व कार्यकारिणी पदाधिकारी , सदस्य , शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर , शिक्षक वर्ग , विद्यार्थी उपस्थित होते .
प्रा . संदेश कासार , प्रा . के . व्ही . जाधव , डॉ . महेजबीन सय्यद , प्रा . आरोटे यांनी सूत्रसंचालन केले . 📚
——————––————————-
🗒🗒