पर्यटन

पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

अहिल्यानगर, दि.२० : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.

🔶 सहल तपशील –


          सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
          शुभारंभ दिनांक: ९ जून २०२५
          कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
          प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
          प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे
🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –
मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई.
 
🏰 प्रमुख स्थळांची माहिती –
          रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
          लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
          कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
          शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
          भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
          प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
          कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
          पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
 
💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): –
            उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३एसी), सुपीरियर (२एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे.  सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
 
✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: –
          भारत गौरव ट्रेनने प्रवास
          वातानुकूलीत/ विनावातानुकूलीत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
          सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड
          ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
          प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)
          सुरक्षा व्यवस्था.
 
❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: –
          साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.
          खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.
          इतर कोणताही वैयक्तिक खर्च.
          कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.
 
🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –
          पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
          दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
          तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
          चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
          पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
          सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).
 

आरक्षण व अधिक माहिती साठी संकेतस्थळ-https://www.irctctourism.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button