इतर

अकोल्यात अवैध देशी दारू पकडली ,चार लाखाचा माल हस्तगत ,एकास अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

अकोले प्रतिनिधी

कोल्हार- घोटी, रोडवर इंदोरी फाटा ता. अकोले जि. अहिल्यानगर या परिसरात खाजगी वाहनातून
बेकायदेशीर रित्या देशी दारुची वाहतूक होते. अशी खात्रीशीर बातमी राज्य उत्पादन शुल्क या विभागास मिळाल्याने दि. २०/०५/२०२५ रोजी
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांचे संपूर्ण स्टाफसह सापळा रचण्यात आला असता इंदोरी फाटा कोल्हार-घोटी रोडवर इंदोरी फाटा ता. अकोले जि. अहिल्यानगर या ठिकाणी दि. २०/०५/२०२५ रोजी संध्याकाळी १९.३० वा. च्या सुमारास फोर्ड कंपनीची फिगो ग्रे रंगाची चार चाकी वाहन क्र. एमएच १५, डी.सी – २५९५ कोल्हार-घोटी, रोडवर इंदोरी फाटा ता.अकोले जि.अहिल्यानगर या रस्त्याने येत असल्याचे दिसून आले. सदर वाहनास थांबण्याचा इशारा करून सदरचे वाहन थांबविण्यात आले. सदर वाहनाची तपासणी केली असता वाहन चालकाच्या सीटच्या मागील बाजूस व वाहनाच्या मागील डिक्की मध्ये देशी दारुचे बॉबीसंत्रा ब्रेडचे दारूचे १८० मिली क्षमतेचे २० बॉक्स (९६० बाटल्या) व ९० मिली क्षमतेचे ०४ बॉक्स (४०० बाटल्या) असे एकूण २५ बॉक्स मिळून आले.

सदर गुन्ह्याची एकूण देशी दारू व वाहनासह एकूण
४,३१,२००/- किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने वाहनासह देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

सदर वाहन चालक आशितोष बाळू गुंजाळ, वय २६ वर्षे, रा. गुंजाळवाडी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना जागीच अटक करून सदरचे वाहन जप्त करून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) व ९८ (२) अन्वये दि.२०/०५/२०२५ रोजी गुन्हा १९८ / २०२५ नुसार गुन्ह्याची नोंद केलेली आहे.

सदरची कारवाई डॉ. राजेंद्र देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. सागर
धोमकर, विभागीय उप आयुक्त रा. उ. शु. पुणे विभाग पुणे यांचे आदेशानुसार व श्री. प्रमोद सोनोने अधीक्षक,
रा.उ.शु.अहिल्यानगर,प्रवीण कुमार तेली उप अधीक्षक, रा.उ.शु. अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सुनील सहस्रबुद्धे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग संगमनेर जवान श्री. वसंत पालवे, श्री. तौसिफ शेख जवान, श्री. सुशांत कासुळे जवान नि वाहन चालक तसेच महिला जवान सरस्वती वराट, स्वाती फटांगरे यांनी सदर कारवाईत मदत केली. सदर गुन्ह्यातील
पुढील तपास निरीक्षक श्री.सुनील सहस्रबुद्धे, हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button