पारनेर तालुक्यात पायोनियर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पायोनियर कंपनीच्या वतीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील वासुंदे, खडकवाडी, पिंपळगाव रोठा, नांदूर पठार, पाडळी, किन्ही, रायतळे, दैठणे गुंजाळ, सारोळा अटवाई, गोरेगाव, वाळवणे, पिंपरी गवळी, पानोली, कान्हूर, पळशी, वनकुटे, ढवळपूरी, करंडी, चिंचोली, पुनेवाडी आणि पिपळनेर या गावांमध्ये या कार्यशाळा यशस्वीपणे पार पडल्या.
या उपक्रमांतर्गत पायोनियर कंपनीचे अधिकारी रणवीर देशमुख, प्रवीण चौधरी, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाजरी आणि मक्याच्या पिकांच्या पेरणीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करत आहेत.
या कार्यशाळांमध्ये पायोनियर 86M94 बाजरी आणि P3524 मका या उत्कृष्ट वाणांच्या पिकांची माहिती देण्यात आली. हे वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत असून, त्यांच्या उत्पादनक्षमतेमुळे शेतकऱ्यांची पसंती मिळवत आहेत. कंपनीच्या तज्ज्ञांनी पेरणीची योग्य पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि पीक संरक्षणाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.या उपक्रमाचे तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
खडकवाडी येथील बबन गागरे, वनकुटे येथील सुरेश डुकरे, वासुंदे येथील भास्कर झावरे, मच्छिंद्र वाबळे, पाडळी तर्फे कान्हूर येथील योगेश दावभट आणि पिंपळगाव रोठा येथील दत्तात्रय घुले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
पायोनियर कंपनीचे अधिकारी आमच्या बांधावर येऊन पेरणीची योग्य पद्धत आणि उत्कृष्ट वाणांची माहिती देत आहेत. यामुळे आमच्या शेतीला नवी दिशा मिळेल. उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे बाजरी व मका ही उत्तम प्रतीचं वाण आहे.
मच्छिंद्र वाबळे (प्रगतिशील शेतकरी, वासुंदे)