सावरगाव येथील महिलांसाठी एकविरा देवी दर्शन यात्रा

राणीताई लंके यांच्या हस्ते नारळ वाढवून बसेस रवाना
पारनेर प्रतिनिधी
दत्ता ठुबे:
नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या विचार प्रेरणेतून आणि शिवाजी बेलकर मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून सावरगाव येथील सर्व वाड्या आणि वस्त्यांवरील महिलांसाठी मोफत एकविरा देवी दर्शन यात्रा उत्सव गुरुवार 22 मे रोजी आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सावरगावचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गायखे तसेच एकता कन्ट्रक्शनचे संचालक आणि उद्योजक संतोष गायखे यांच्या विशेष प्रयत्नांनी करण्यात आले. या यात्रेत सावरगाव येथील 500 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आणि एकविरा देवीचे दर्शन घेतले.
या उपक्रमांतर्गत महिलांसाठी सुसज्ज आणि आरामदायी बसची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार यासारख्या सर्व सुविधा महिलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व व्यवस्था एकविरा देवीच्या महिला भक्तांना सुखद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देतील याची विशेष काळजी घेण्यात आली होती. सावरगाव येथून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके यांच्या हस्ते नारळ वाढवून या यात्रेच्या बसेस एकविरा देवीच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी माजी सभापती गंगाराम बेलकर, शिवाजी बेलकर, संतोष गायखे, रवींद्र गायखे, गणेश गायखे, नारायण गायखे, नवनाथ राळे, अक्षय कळमकर, अश्विन गायखे, गणेश भोसले, दत्ता भोसले, राजेंद्र जगताप सर, अनिकेत गायखे, शशी आंधळे, रामभाऊ थोरात, रणधीर शिंदे, जिजाभाऊ चिकने, साहेबराव चिकने, दादाभाऊ चिकणे, हरिभाऊ साळवे, रामदास साळवे, अक्षय माने, बाळशिराम गायखे, दत्तात्रय भोसले, नारायण गायके, गणेश भोसले, अक्षय कळमकर, अनिकेत गायखे, संतोष शिंदे बाळासाहेब शिरतार, विठ्ठल माने, बाबाजी भोसले, भाऊ चिकणे, गंगाराम चिकणे, शिवाजी भोसले, लहु गायखे, रामदास मगर यांच्यासह सावरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमाचे खासदार निलेश लंके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके, दीपक लंके, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर आणि बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी बेलकर यांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमामुळे गावातील महिलांना एकविरा देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळालीच, शिवाय सामाजिक एकता आणि बंधुभाव वाढवण्यासही हातभार लागला. खासदार निलेश लंके यांनी या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि असे सामाजिक उपक्रम भविष्यातही राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे त्यांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि गावातील सामाजिक वातावरणही अधिक सकारात्मक झाले.
रवींद्र गायखे आणि संतोष गायखे यांनी सांगितले की हा उपक्रम गावातील महिलांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्या श्रद्धेला सन्मान देण्याचा एक छोटासा प्रयास आहे. भविष्यातही असे उपक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा त्यांचा मानस आहे.हा उपक्रम सावरगाव गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात एक नवीन पायंडा रचणारा ठरला असून, यामुळे गावातील महिलांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.