मुळा नदीवरील आंबित धरण भरले!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुळापाणलोट क्षेत्रात पावसाची गेल्या आठ दिवसापासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे या मुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील आंबित धरण आज मंगळवारी(२७) दुपारी ओव्हर फ्लो झाले आहे
मुळा नदी उगमा जवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण आज ओव्हरफ्लो झाले अहमदनगर जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे जिल्ह्यातील पहिले धरण आहे मान्सून पूर्व दमदार एन्ट्रीने अकोले तालुक्यातील हे पहिले धरण भरले आहे
घाटमाथ्यावर तसेच सम्पूर्ण अकोले तालुक्यात पाऊस सुरू आहे यामुळे मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मुळा नदी वाहू लागली आहे उगमाजवळ असणाऱ्या आंबित या लघु प्रकल्पाची साठवण क्षमता 193.97दशलक्ष घन फूट आहे
आज मंगळवारी दुपारी एक वाजता धरण ओसंडून वाहू लागले आहे यामुळे मुळा नदी वाहती झाली असून मुळा नदीचा प्रवाह पुढे झेपावला असून हा प्रवाह पिंपळगाव खांड धरणात स्थिरावणार आहे मुळा पानलोट क्षेत्रात व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे मागील वर्षी आंबित धरण 28 जूनला भरले यावर्षी एक महिना अगोदर अंबित ओव्हर फ्लो झाले आहे