कोतुळ येथील केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांचे चे मोफत प्रवेश सुरू!

कोतुळ प्रतिनिधी
कोतुळ येथील केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती (एसटी) प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थी चे मोफत प्रवेश सुरू असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक डॉ.भाऊसाहेब नाना गिते यांनी दिली
श्री. कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, संचलीत
केंद्रिय निवासी अनुसुचीत जमाती (एस.टी.). प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कोतूळ सुरू आहे या शैक्षणिक वर्षा साठी इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतच्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे सुरु आहे
संस्थेकडे प्रशस्त भव्य दिव्य इमारत. अद्यावत व्यायामशाळा. मुला-मुलींसाठी स्वतंत्र जेवणाची व निवासाची मोफत व्यवस्था. अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. नियमित आरोग्य तपासणी सुसज्ज ग्रंथालय व प्रयोग शाळा. संगणक कक्ष व डिजिटल वर्ग आशा सुविधा असून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश,मोफत गणवेश,मोफत पाठ्यपुस्तक व लेखन साहित्य, १००% गुणवतेची हमी कृतीयुक्त आनंददायी शिक्षण,विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष. एस.एस.सी. निकालाची उत्तम परंपरा. भव्य क्रिडांगण व नैसर्गिक वातावरण शिक्षक व पालक मेळावे. पिण्यासाठी ROच्या पाण्याची सुविधा. विद्यार्थ्यांसाठी गरम पाण्याची सुविधा विद्यार्थ्यांना करमणुकीसाठी TV हॉल, १०० % इकोफ्रेंडली शाळा असून अभ्यास पक्का होण्यासाठी जादा तासिका सुरू आहे ठाकर, भिल्ल, महादेव कोळी, फासे पारधी या जातीस विशेष प्राधान्य. दिले जाते
प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा प्रवेश प्रक्रियेसाठी लागनारी आवश्यक कागदपत्रे : १) विद्यार्थ्यांचे चार कलर फोटो. २) आधारकार्डचे झेरॉक्स. 3) मागील वर्षाची गुणपत्रिका झेरॉक्स. सह प्रवेश अर्ज साठी सुप्रिया गिते मुख्याध्यापिका केंद्रिय निवासी अनुसूचित जमाती (एसटी) प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,सरकारी बंगल्याजवळ कोतूळ- अकोले रोड कोतूळ ता.अकोले, जि. अहिल्यानगर येथे सम्पर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिव ,कार्यकारी विश्वस्त व ,विश्वस्त यांनी केले आहे