अहिल्यादेवींचे सामाजिक आणि प्रशासकीय कार्य प्रेरणादायी-सुजित झावरे पाटील

वासुंदे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक आणि प्रशासकीय कार्य आजही प्रेरणादायी आहे. या पुरस्काराने गावातील महिलांचे सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळेल. वासुंदे गावातील महिला या पुरस्काराच्या माध्यमातून नव्या उमेदीने कार्य करतील, असा विश्वास आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केला.
वासुंदे गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायतीच्या वतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
सुरेखा झावरे, मंदा साळुंके, विद्या वाळुंज, स्मिता दाते, अक्का रोकडे, शांता साळुंखे, सुनंदा दुधावडे आणि भारती सावंत या सेविका व सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, सरपंच विमल झावरे, उपसरपंच शंकर बर्वे, सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, विलास साठे, रामदास झावरे, मारुती उगले, बापूसाहेब गायखे, सुदाम भालके, बाळासाहेब शिंदे, शिक्षक नेते प्रवीण झावरे, संग्राम झावरे, सुरेश शिंदे, उद्योजक विठ्ठल झावरे, पो. मा. झावरे, भाऊ सैद, लक्ष्मण झावरे, लहानू झावरे, संदीप खंडाळे, तुकाराम झावरे, इंजि. निकील दाते, इंजि. प्रसाद झावरे, दिलीप पाटोळे, कैलास दाते, विकास झावरे, बाळासाहेब झावरे, पोपट हिंगडे, संतोष दाते, भास्कर झावरे, साहेबराव गुंजाळ, कुमार रोहकले ग्रामसेवक लोंढे बी.टी. यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम गावातील सामाजिक एकतेचे आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक ठरला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही असे प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली.